न्यायालयीन सुनावणीस संभाजी भिडे गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 12:47 AM2018-08-08T00:47:49+5:302018-08-08T00:48:40+5:30

नाशिक : आंबे खाल्ल्याने मुले होत असल्याचा कथित दावा करणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर तथा संभाजी भिडे मंगळवारी नाशिकमध्ये झालेल्या न्यायालयीन सुनावणीस गैरहजर राहिले. विशेष म्हणजे भिडे यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले व आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पुरावे असल्याचा दावादेखील केला होता. परंतु ते हजर नसल्याने आता १० आॅगस्ट ही पुढील तारीख देण्यात आली आहे.

 Sambhaji Bhaye absent in judicial hearing | न्यायालयीन सुनावणीस संभाजी भिडे गैरहजर

न्यायालयीन सुनावणीस संभाजी भिडे गैरहजर

Next
ठळक मुद्देमुले आणि मुली भेदाभेद करण्याच्या मुद्द्यावर भिडे यांच्यावर आरोप

नाशिक : आंबे खाल्ल्याने मुले होत असल्याचा कथित दावा करणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर तथा संभाजी भिडे मंगळवारी नाशिकमध्ये झालेल्या न्यायालयीन सुनावणीस गैरहजर राहिले. विशेष म्हणजे भिडे यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले व आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पुरावे असल्याचा दावादेखील केला होता. परंतु ते हजर नसल्याने आता १० आॅगस्ट ही पुढील तारीख देण्यात आली आहे.
भिडे यांच्या दाव्यासंदर्भात नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पांडे यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल केली आहे. नाशिकमध्ये एका मेळाव्यात बोलताना संभाजी भिडे यांनी, आपल्या शेतातील आंबे खाल्ल्याने मुलेच होत असल्याचा दावा करताना एकूण १८० जणांना आंबे देण्यात आले. त्यापैकी १५० दाम्पत्याला मुलेच झाल्याचेही त्यांनी म्हटले होते. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने यासंदर्भात दीडशे दाम्पत्याची माहिती मागितली होती. तसेच शेतातील ती झाडे कोठे आहेत, असा पत्ता विचारला होता. पालिकेच्या वैद्यकीय विभागाने मुले आणि मुली भेदाभेद करण्याच्या मुद्द्यावर भिडे यांच्यावर आरोप ठेवला आहे.

Web Title:  Sambhaji Bhaye absent in judicial hearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक