भिडेंचा बोलविता धनी कोण? छगन भुजबळांचा सवाल; कडक कारवाईची मागणी

By श्याम बागुल | Published: July 31, 2023 08:17 PM2023-07-31T20:17:51+5:302023-07-31T20:18:26+5:30

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्या विषयी अनुद्गार काढण्यापाठोपाठ महात्मा ज्योतीबा फुले यांच्याविषयीही आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.

Sambhaji Bhide statement controversial, Strict action demanded by Chhagan Bhujbal | भिडेंचा बोलविता धनी कोण? छगन भुजबळांचा सवाल; कडक कारवाईची मागणी

भिडेंचा बोलविता धनी कोण? छगन भुजबळांचा सवाल; कडक कारवाईची मागणी

googlenewsNext

नाशिक : संभाजी उर्फ मनोहर भिडे हे जाणून बुजून राष्ट्रपुरूषांच्या बाबतीत नेहमीच आक्षेपार्ह विधाने करीत आहेत. ते स्वत:च मुद्दाम हे सारे करीत आहेत की त्यांच्या पाठीमागे बोलविता धनी कोणी वेगळा आहे, असा सवाल करून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भिडे यांच्यावर सरकारने लवकरात लवकर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. 

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्या विषयी अनुद्गार काढण्यापाठोपाठ महात्मा ज्योतीबा फुले यांच्याविषयीही आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्या संदर्भात नाशिक दौऱ्यावर असलेले छगन भुजबळ यांच्याशी प्रसार माध्यमांनी संपर्क साधला असता, भुजबळ यांनी भिडे यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. महात्मा गांधी, महात्मा फुले या राष्ट्रपुरूषांबाबत नेहमीच वादग्रस्त विधाने करणाऱ्या भिडेंना शासनाने तात्काळ अटक करावी या मागणीसाठी अखिल भारतीत महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभर आंदोलन केले जात आहे. 

पुणे येथे येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर देखील भिडे यांच्या वक्तव्याबद्दल माहिती दिली पाहिजे असे सांगितले. भिडे यांच्यावर महात्मा फुले समता परिषदेने कोर्टात केस दाखल केली आहे. परंतु त्याच्या सुनावणीसाठी तारखांवर तारखा मिळत आहे. असे सांगून भिडे हे जाणून बुजून अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत. ते स्वत: करीत आहेत की त्यांच्या पाठीमागे बोलविता धनी कोणी वेगळा आहे. जेणे करून तुम्ही बोला बघुया समाजात ते रूजतयं का आणि त्या माध्यमातून इतिहास बदलता येईल काय असा त्यामागचा डाव तर नाही ना असा सवालही भुजबळ यांनी केला आहे.

Web Title: Sambhaji Bhide statement controversial, Strict action demanded by Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.