इगपुरीत संभाजी ब्रिगेडचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 11:33 PM2017-10-05T23:33:20+5:302017-10-06T00:12:09+5:30

समृद्धी महामार्गबाधित शेतकºयाना जास्तीत जास्त मोबदला मिळावा. इगतपुरी, वाडीवºहे, गोंदे औद्योगिक वसाहतीत स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य द्यावे. भावली धरणाचे पाणी नगर, येवला या ठिकाणी सोडण्यापूर्वी तळेगाव डॅममध्ये सोडून इगतपुरी शहराची तहान भागवावी, अशा मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडने इगतपुरी शहरात आक्रमक मोर्चा काढला.

Sambhaji Brigade's Front in IGP | इगपुरीत संभाजी ब्रिगेडचा मोर्चा

इगपुरीत संभाजी ब्रिगेडचा मोर्चा

Next

इगतपुरी : समृद्धी महामार्गबाधित शेतकºयाना जास्तीत जास्त मोबदला मिळावा. इगतपुरी, वाडीवºहे, गोंदे औद्योगिक वसाहतीत स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य द्यावे. भावली धरणाचे पाणी नगर, येवला या ठिकाणी सोडण्यापूर्वी तळेगाव डॅममध्ये सोडून इगतपुरी शहराची तहान भागवावी, अशा मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडने इगतपुरी शहरात आक्रमक मोर्चा काढला.
देश की ब्रिगेड संभाजी ब्रिगेड, आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा, समृद्धी महामार्गबाधित शेतकºयाना जास्तीत जास्त मोबदला मिळावा, सातबारा कोरा झालाच पाहिजे, अशा विविध घोषणा देत हातात संभाजी ब्रिगेडचे झेंडे घेऊन तीन लकडी पुलापासून निघालेला मोर्चा बाजारपेठ, रेल्वे गेट, खालची पेठमार्गे तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चा तहसील कार्यालयात प्रवेश करणाºया मोर्चेकºयांना पोलिसांनी अडवले. यावेळी निवासी नायब तहसीलदार शिंदे संभाजी ब्रिगेडचे निवेदन स्वीकारण्यासाठी आले. तहसीलदार अनिल पुरे यांना आधी कळवूनही मोर्चाचे निवेदन घेण्यासाठी का थांबले नाही, असा संताप व्यक्त करत निषेध व्यक्त केला. यावेळी पोलिसांशी वाद झाला. तहसीलदार येत नाही तोपर्यंत आम्ही गेटवर ठिय्या मांडू, अशी आग्रही भूमिका संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाºयांनी घेतली. पोलिसांनी तडजोडीची भूमिका घेत कार्यालयात निवेदन देण्यास परवानगी दिली. निवासी नायब तहसीलदार संजय शिंदे यांच्याशी विविध मागण्यांबाबत पदाधिकाºयांनी चर्चा केली. जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी जयप्रकाश गायकवाड, उपाध्यक्ष कृष्णा घाटोळ, कार्याध्यक्ष भाऊसाहेब शिरोले, नाशिक महानगरप्रमुख प्रफुल्ल पाटील, राजाभाऊ जाधव, नीलेश जगताप, किरण मानके, नीलेश पेलमहाले, गणेश पाटील, शहराध्यक्ष समर सोनार, किरण बर्डे, सचिन बीडकर, दिनेश भांगडे, भगवान माळी, नीलेश जगताप, योगेश सोनवणे उपस्थित होते.

Web Title: Sambhaji Brigade's Front in IGP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.