एकाच दिवशी साडेचार हजार परप्रांतीय रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 10:42 PM2020-05-12T22:42:30+5:302020-05-12T23:28:35+5:30
नाशिक : परप्रांतीय प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या बसेसच्या माध्यमातून मंगळवारी (दि.१२) सुमारे साडेचार हजार परप्रांतीय प्रवाशांना मध्य प्रदेशातील सीमारेषेवर सोडण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातून मध्य प्रदेशकडे पायी निघालेल्या प्रवाशांना बसेसने सोडले जात आहे.

दोन आठवड्यांपूर्वी काही मजुरांसाठी नाशिकरोड रेल्वेस्थानकातून दोन रेल्वेगाड्या रवाना करण्यात आलेल्या आहेत. आता पायी जात असलेल्या प्रवाशांना बसमध्ये बसवून रवाना केले जात आहे. ठाणे आणि मुंबईमधून हजारोंच्या संख्येने मजूर गावाकडे निघाले आहेत. या मजुरांसाठी राज्य परिवहन महामंडळाने गाड्या सुरू केल्या असून, गेल्या तीन दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून परप्रांतीय मजूरांना मध्य प्रदेशातील सीमारेषेपर्यंत सोडले जात आहे.
------
..अशा सोडल्या बसेस
नाशिक आगार एक- ११, नाशिक आगार दोन- ९, मनमाड- ४, इगतपुरी- २, लासलगाव- ५, पिंपळगाव- ८, नांदगाव- ७, सिन्नर- ५, कळवण- २ तर निफाड- १ येथून सुमारे ५४ बसेस सोडण्यात आल्या तर १५० बसेस ठाणे जिल्ह्यात पाठवून तेथून प्रवासी वाहतूक करण्यात आली.