श्रीक्षेत्र कावनई येथे एकाच रात्री धाडसी चोºया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:49 AM2017-08-24T00:49:23+5:302017-08-24T00:49:28+5:30
इगतपुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र कावनई येथे काल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. कपिलधारा तीर्थक्षेत्रातील शंकर मंदिरातील तीन लोखंडी दानपेटया व कामाक्षी मंदिरातील दानपेटी अशा चार दानपेटीतील चाळीस ते पन्नास हजार रुपये रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला.
घोटी : इगतपुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र कावनई येथे काल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. कपिलधारा तीर्थक्षेत्रातील शंकर मंदिरातील तीन लोखंडी दानपेटया व कामाक्षी मंदिरातील दानपेटी अशा चार दानपेटीतील चाळीस ते पन्नास हजार रुपये रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला. दरम्यान या चोरीप्रकरणातील तीन दानपेट्या कुलूप तुटलेल्या अवस्थेत मंदिरालगतच फेकून दिल्या. तर मंदिरातील एक पेटी जागीच रिकामी करून त्यातील रक्कमही चोरट्यांनी गायब केली. गेल्या अनेक वर्षात अनेक वेळा या ठिकाणी चोºया झाल्या आहेत. या घटनेत कपिलधारा तीर्थक्षेत्रातील शंकर मंदिरातील दोन दानपेटया चोरट्यांनी उचलून नेल्या तर एक दानपेटी उचलता न आल्याने तिचे कुलुप तोडून ती जागीच रिकामी केली. जवळच असलेल्या कामाक्षी देवी मंदिरातील दानपेटीही चोरट्यांनी उचलून नेऊन रक्कम चोरून नेली. एकाच रात्री दोन मंदिरातील दानपेट्या व त्यातील रक्कम चोरीस गेल्याने खळबळ उडाली. मंदिराचे पुजारी उडीया महाराज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घोटी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी सकाळी चोरी झाल्याचे उघडकीस आले. घोटीचे निरीक्षक प्रभाकर पाटील, उपनिरीक्षक माळी, पोलीस कर्मचारी संदीप शिंदे, सुहास गोसावी, पाटील आदींनी पंचनामा केला. पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ज्ञ यांनाही पाचारण करण्यात आले. श्वानाने मंदिर परिसराचा माग दाखविला. ठसे तज्ज्ञांनी ठश्यांचे नमुने घेतले. यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाल्याने पोलिसांनी संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी तीर्थक्षेत्राचे महंत फलाहारी महाराज, ट्रस्टी कुलदीप चौधरी, दीपक मंगे, भरत पटेल आदींनी धाव घेऊन माहिती घेतली. यावेळी तीनही दानपेट्या चोरट्यांनी रिकाम्या करून परिसरातच फेकून दिल्या.