नव्या व्याधींवर आयुर्वेदात प्रभावी औषधोपचार समीर जमदग्नी : ‘श्री विश्व’ राष्टÑीय परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 11:56 PM2017-09-17T23:56:32+5:302017-09-18T00:05:44+5:30

माणसाच्या बदलत्या जीवनशैलीमुळे काळानुरूप व्याधीदेखील बदलल्या असून, नवनवीन आजार दररोज समोर येत आहेत. आयुर्वेदशास्त्र हे प्राचीन वैद्यकशास्त्र असून, यामध्ये सर्व नव्या व्याधींवर प्रभावी औषधोपचार उपलब्ध असून, त्यासाठी अभ्यास गरजेचा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ वैद्य समीर जमदग्नी यांनी केले.

Samir Jamadagni: 'World World' National Seminar on Effective Medicine in Ayurveda on New Histology | नव्या व्याधींवर आयुर्वेदात प्रभावी औषधोपचार समीर जमदग्नी : ‘श्री विश्व’ राष्टÑीय परिसंवाद

नव्या व्याधींवर आयुर्वेदात प्रभावी औषधोपचार समीर जमदग्नी : ‘श्री विश्व’ राष्टÑीय परिसंवाद

googlenewsNext

नाशिक : माणसाच्या बदलत्या जीवनशैलीमुळे काळानुरूप व्याधीदेखील बदलल्या असून, नवनवीन आजार दररोज समोर येत आहेत. आयुर्वेदशास्त्र हे प्राचीन वैद्यकशास्त्र असून, यामध्ये सर्व नव्या व्याधींवर प्रभावी औषधोपचार उपलब्ध असून, त्यासाठी अभ्यास गरजेचा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ वैद्य समीर जमदग्नी यांनी केले.
श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट कोल्हापूरच्या वतीने महाराष्ट आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये एकदिवसीय विश्व व्याख्यानमालेअंतर्गत आयुर्वेद आणि संशोधनपद्धती या विषयावर राष्टÑीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून ट्रस्टचे आनंदनाथ महाराज चांगवडेकर होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, डॉ. कैलास चव्हाण, डॉ. आशुतोष गुप्ता, वैद्य मीरा औरंगाबादकर, वैद्य प्रवीण जोशी, वैद्य अनिल बनसोड उपस्थित होते. यावेळी जमदग्नी यांनी ‘व्यावहारिक आयुर्वेद’ या विषयावर बोलताना सांगितले, आयुर्वेद उपचारपद्धतीसाठी ग्रंथांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. नव्या व्याधी जरी असल्या तर आयुर्वेदामध्ये उपचार उपलब्ध आहे. निसर्ग हा आयुर्वेदाचा मोठा आधार असून, औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात आहे, मात्र त्या ओळखून त्यांचा गुणधर्म जाणून घेण्यासाठी अभ्यासातून शोधकवृत्ती विकसित करण्यावर भर देण्याची गरज आहे. दरम्यान, औरंगाबादकर यांनी यावेळी पंचकर्म व त्वचारोग या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले, पंचकर्म ही आयुर्वेदामधील अत्यंत प्रभावी अशी त्वचाविकारासह पोटाच्या विकारावरील उपचारपद्धती आहे. पंचकर्म उपचार पद्धतीदरम्यान तसेच त्यानंतर पथ्यांचे पालन काटेकोरपणे महत्त्वाचे ठरते. पथ्ये पाळली नाही तर या उपचाराचा फायदा प्रभावी स्वरूपात जाणवत नाही. गणेशवाडी आयुर्वेद महाविद्यालय, सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांसह राज्यभरातून सुमारे दीड हजार आयुर्वेदिक उपचार पद्धतीद्वारे प्रॅक्टीस करणारे डॉक्टर उपस्थित होते. सूत्रसंचालन आनंद मानधने, वैद्य मनीष जोशी यांनी केले.







इन्फो—
मंथन आयुर्वेदशास्त्र व उपचारपद्धतींवर
पंचक र्म निदान, दोशा, स्थान, अवस्था, त्वचारोगसह विविध विषयांवर या परिसंवादामध्ये मंथन घडून आले. तज्ज्ञांनी उपस्थित आयुर्वेदशास्त्र शिकणाºया विद्यार्थ्यांसह डॉक्टरांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांमधून एम.डी.चे शिक्षण घेणाºया सुमारे ६८ विद्यार्थ्यांनी विविध संशोधनपर विषयांवर पेपर व पोस्टर प्रेझेंटेशनही सादर केले.
दरम्यान, उत्कृष्ट सादरीकरण व संकल्पनांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.
——
फोटो आर वर १७वैद्य नावाने लोड :
कॅप्शन : श्री विश्व व्याख्यानमालेप्रसंगी दीपप्रज्वलन करताना सद्गुरू आनंदनाथ महाराज. समवेत डावीकडून डॉ. मोहन खामगावकर, वैद्य प्रवीण जोशी, समीर जमदग्नी.

Web Title: Samir Jamadagni: 'World World' National Seminar on Effective Medicine in Ayurveda on New Histology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.