"मन हेलावणारी घटना, समृध्दी महामार्गावरील अपघाताची सखोल चौकशी करणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 02:40 PM2023-10-15T14:40:33+5:302023-10-15T14:41:48+5:30

या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना  मुख्यमंत्री शिंदें यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली

Samrudhi Highway accident will be thoroughly investigated: Bhuse | "मन हेलावणारी घटना, समृध्दी महामार्गावरील अपघाताची सखोल चौकशी करणार"

"मन हेलावणारी घटना, समृध्दी महामार्गावरील अपघाताची सखोल चौकशी करणार"

नाशिक : समृध्दी महामार्गावरील अपघात हा मन हेलवणारा आहे. या अपघातात निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. अपघाताची कारणे तपासून संबंधित दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे यांनी छत्रपती संभाजी नगर येथील घाटी रुग्णालयाला भेटी प्रसंगी दिली.

या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना  मुख्यमंत्री शिंदें यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली असून जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. अपघातातील सर्व प्रवासी नाशिक परिसरातील आहेत. कुणाचाही जीव जाणार नाही यासाठी समृध्दी महामार्गावर उपाययोजना सरकार तर्फे केल्या जात आहेत. अपघाताचे राजकारण करण्यापेक्षा त्यावर उपाय काय केला जावू शकतो याकडे लक्ष असणे महत्वाचे आहे, असे भुसे म्हणाले.

Web Title: Samrudhi Highway accident will be thoroughly investigated: Bhuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.