समृद्धी महामार्ग थेट नाशिकलाही जोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:49 AM2017-12-27T00:49:58+5:302017-12-27T00:50:24+5:30
राज्य सरकारच्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे होणाºया विकासात नाशिक शहराला वाटेकरी करून घेण्यासाठी डेडिकेटेड कनेक्ट देण्यात येईल, अशी घोेषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे इगतपुरी आणि सिन्नरपाठोपाठ शहरालाही थेट सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
नाशिक : राज्य सरकारच्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे होणाºया विकासात नाशिक शहराला वाटेकरी करून घेण्यासाठी डेडिकेटेड कनेक्ट देण्यात येईल, अशी घोेषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे इगतपुरी आणि सिन्नरपाठोपाठ शहरालाही थेट सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. क्रेडाईच्या या बांधकाम व्यावसायिकांच्या संस्थेच्या वतीने आयोजित शेल्टर प्रदर्शनाचा समारोप मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गासाठी पन्नास टक्के शेतकºयांनी जमीन देण्याची तयारी दर्शविली असून, यासंदर्भातील कार्यवाही महिनाअखेरीस पूर्ण होईल. त्यामुळे लवकरच निविदाप्रक्रिया राबवून फेब्रुवारीपासून समृद्धीचे काम सुरू होईल, असा नवा मुहूर्तही फडणवीस यांनी घोषित केला. समृद्धी महामार्ग हा विकासाची मोठी क्षमता बाळगत असून, हा मार्ग देशात महाराष्टÑाला पुढे नेणारा ठरणार आहे. त्याची विकासाची क्षमता ओळखून क्रेडाईने ही चांगली मागणी केल्याचेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याची घोषणा केल्याने त्याच्यासाठी ग्रामीण भागात साडेबारा लाख, तर शहरी भागात साडेदहा लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगून राज्यात घरांचा स्टॉक करून गरिबांना रास्त घरे देण्याची योजना आहे, असेही ते म्हणाले. पालकमंत्री गिरीश महाजन, तसेच आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल अहेर, महापौर रंजना भानसी, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण, क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष सुनील कोतवाल, माजी राज्य अध्यक्ष अनंत राजेगावकर आणि शेल्टरचे समन्वयक उदय घुगे यावेळी उपस्थित होते.
मनपाला बससेवेसाठी हिरवा कंदील
च्नाशिक शहरात सध्या बसफेºया कमी केल्याने मोठी समस्या निर्माण झाली असून, त्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने बससेवा ताब्यात घ्यावी त्यासाठी राज्य सरकार सहकार्य करेल, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविला.
नाशिक शहर स्मार्ट करणार
च्महापालिका निवडणुकीच्या वेळी नाशिकला दत्तक घेतल्याची घोषणा करणाºया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात या घोषणेचे स्मरण करून देतानाच शहर स्मार्ट करण्यासाठी सर्व प्रस्ताव सकारात्मक पद्धतीने मंजूर करू, तसेच नाशिक शहरात सीसीटीव्ही आणि वायफाय हब करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.