कळवण शहरासह तालुक्यात सामसूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:14 AM2021-04-11T04:14:52+5:302021-04-11T04:14:52+5:30
रस्त्यावर ठिकठिकाणी पोलीस यंत्रणा तैनात असल्यामुळे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी पिटाळून लावले. दरम्यान, कळवण शहरात आजमितीस १५० च्या ...
रस्त्यावर ठिकठिकाणी पोलीस यंत्रणा तैनात असल्यामुळे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी पिटाळून लावले. दरम्यान, कळवण शहरात आजमितीस १५० च्या पुढे कोरोना बाधित रुग्णाचा शासकीय आकडा असून, खासगी औषोधोपचार करून घरात क्वारंटाईन असणाऱ्या बाधितांचा आकडा अधिक आहे. जिल्ह्यात शनिवारी व रविवारी बंदबरोबर आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतल्यामुळे शनिवारी कळवण शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला मेनरोड, सुभाष पेठ, शिवाजीनगर, गणेशनगर, बसस्थानक, जुना ओतूर रोड, गांधी चौक, अंबिका चौक, फुलाबाई चौक, नेहरू चौक, ओतूर रोड परिसरात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. कळवणकरांनी घरात राहणे पसंत केल्यामुळे रस्त्यावर नीरव शांतता होती, शिवाय अभोणा व कनाशी गावामध्ये शांतता दिसून आली.
फोटो- १० कळवण लॉकडाऊन
===Photopath===
100421\10nsk_42_10042021_13.jpg
===Caption===
फोटो- १० कळवण लॉकडाऊन