येवल्यात सामसूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 11:58 PM2020-04-25T23:58:15+5:302020-04-25T23:58:37+5:30

येवला शहरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली असून, शनिवारी (दि.२५) शहरात कडेकोट लॉकडाउन व संचारबंदी लागू करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने रविवार (दि. २६) ते मंगळवार (दि.२८) पावेतो तसेच गुरुवार (दि. ३०) ते शनिवार (दि.२ मे) पर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Samsum in Yeola | येवल्यात सामसूम

येवला येथील गल्ली-बोळ झाडांच्या फांद्या आणि बांबू टाकून बंद करण्यात आल्या आहेत.

Next
ठळक मुद्देकोरोनाचा शिरकाव। संपूर्ण लॉकडाउन; रहिवाशांमध्ये खळबळ; जनता कर्फ्यूचे आवाहन

योगेंद्र वाघ।
येवला : शहरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली असून, शनिवारी (दि.२५) शहरात कडेकोट लॉकडाउन व संचारबंदी लागू करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने रविवार (दि. २६) ते मंगळवार (दि.२८) पावेतो तसेच गुरुवार (दि. ३०) ते शनिवार (दि.२ मे) पर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मालेगाव शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर वाढत चाललेल्या रुग्ण संख्येने येवलेकरांमध्येही शंकेची पाल चुकचुकत होती. मालेगाव आणि येवला शहराची नातेसंबंधांची नाळ मोठी आहे. मालेगावमध्ये पोहोचलेला कोरोना येवल्यापर्यंत येऊ नये म्हणून शहरवासीय विशेष खबरदारी घेत होते. प्रशासनही सज्ज होऊन आवश्यक उपाययोजना करीत होते. रोज नवनवीन अफवा व चर्चा सुरू होत्या. या दरम्यान, काही संशयितांच्या चाचण्याही झाल्या, परंतु त्या निगेटिव्ह आल्याची माहिती मिळते. शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ४७ वर्षीय महिलेला कोरोना विषाणूची लक्षणे दिसून आल्याने, सदर महिलेला नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. शुक्रवारी संध्याकाळी सदर महिला रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली. सदर महिलेची सून गेल्या आठवड्यात येवला ग्रामीण रुग्णालयात बाळंतपणासाठी आली होती, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला नाशिकला संदर्भ सेवा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली, मात्र कुटुंबीयांनी नाशिकला न घेऊन जाता सदर महिलेला बाळंतपणासाठी मालेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात येते. कोरोना विषाणू संसर्ग झालेली ४७ वर्षीय महिला ही गर्भवती महिलेची सासू आहे. दरम्यान, कोरोनाबाधित महिलेच्या कुटुंबीयातील ९ नातेवाइकांना कोरोना तपासणीसाठी नाशिक येथे शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले आहे. शहरात रविवार (दि.२६) ते मंगळवार (दि.२८) पावेतो तसेच गुरुवार (दि.३०) ते शनिवार (दि.२ मे) पावेतो जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. जनता कर्फ्यू दरम्यान, बुधवार, दि. २९ एप्रिल व रविवार दि.३ मे रोजी अत्यावश्यक सेवा, भाजीपाला, किराणा सुरू राहतील, असेही समितीने स्पष्ट केले आहे. जनता कर्फ्यूमध्ये मेडिकल व हॉस्पिटल वगळून बाकी सर्व सेवा बंद राहणार असून, शहरहितासाठी शहरवासीयांनी जनता कर्फ्यूचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही सर्वपक्षीय कृती समितीचे राजेश भंडारी, गौरव कांबळे, शैलेश कर्पे, दीपक लोणारी, तरंग गुजराथी, धीरज परदेशी, राजकुमार लोणारी, गुड्डू जावळे, रूपेश घोडके, अविनाश कुक्कर, सुभाष गांगुर्डे, सचिन सोनवणे, बापू गाडेकर, राम बडोदे, मनोज दिवटे, योगेश शिंदे, अतुल घटे आदींनी केले आहे.

कोरोना संसंर्गीत रुग्ण सिद्ध झाल्याने प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी एका आदेशाद्वारे शहरातील प्रभाग क्र मांक ५ मधील मिल्लतनगरचे सदरचे ठिकाण केंद्रबिंदू घोषित करून त्याच्यापासून ३ कि.मी. अंतर परिघातील क्षेत्र कंटेनमेंट क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. ५ कि.मी. परिघातील क्षेत्र बफरझोन म्हणून घोषित केले आहे.

या क्षेत्रात पूर्णपणे संचारबंदी लागू करण्यात आली असून, प्रवेश आणि निर्गमित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या बरोबरच मास्क आवश्यक करण्यात आले आहे. कंटेनमेंंट क्षेत्रातील सर्व घरांचे सर्वेक्षण निर्धारित वेळेत पूर्ण करणे, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी वैद्यकीय पथकाची नियुक्ती करावी, सदर क्षेत्रात चेक पोस्ट व एक्झिट पॉइंटवर आरोग्य क्षेत्रातील पथकाद्वारे सातत्याने तपासणी करावी आदी आदेश प्रांताधिकारी शर्मा यांनी दिले आहेत.

प्रांताधिकारी शर्मा यांच्या आदेशानुसार येवला तहसीलदार रोहिदास वारूळे यांनी, कंटेनमेंट क्षेत्र परिसर सील केला असून, दूध आणि अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण परिसर शंभर टक्के लॉकडाउन करून संचारबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश येवला नगरपालिका आणि शहर पोलिसांना दिले आहेत.
शेतमाल लिलाव बंद
येवला बाजार समितीने सोमवार, दिनांक २७ एप्रिल रोजी होणारा कांदा, मका व भुसार धान्य लिलाव बंद ठेवला आहे. त्यामुळे कांदा लिलावासाठी वाहन नोंदणीही रद्द करण्यात आल्याचे सचिव व्यापारे यांनी सांगितले.

रस्ते ब्लॉकडाउन
सुरक्षेचा उपाय म्हणून गल्ली-बोळांसह प्रमुख रस्ते ब्लॉकडाउन केले आहे. ठिकठिकाणी लाकडी बांबू, बल्ल्या, झाडे-झुडपे, बॅरिकेड्स, हातगाड्या, पलंग आदींच्या साहाय्याने नागरिकांनी रस्ते ब्लॉकडाउन केले आहे.

पोलीस अ‍ॅक्शन मोडवर
कोरोना संसर्गीत रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर दिसून आले. विनाकारण रस्त्यांवर फिरणाºयांना चांगलेच फटकावणे सुरू केले. त्यामुळे बाजारपेठा, रस्ते, चौफुली निर्मनुष्य झाली होती.

Web Title: Samsum in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.