‘वैनतेय’च्या सानप यांनी साकारली शैक्षणिक राखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 01:18 AM2017-08-07T01:18:24+5:302017-08-07T01:18:49+5:30

येथील वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील शिक्षक गोरख सानप यांनी या शाळेच्या शिक्षक- पालक सभेत स्वत: शैक्षणिक साहित्यापासून तयार केलेल्या राखीचे सादरीकरण केले.

Sanap, a teacher of Ventee, is an academic teacher | ‘वैनतेय’च्या सानप यांनी साकारली शैक्षणिक राखी

‘वैनतेय’च्या सानप यांनी साकारली शैक्षणिक राखी

googlenewsNext

निफाड : येथील वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील शिक्षक गोरख सानप यांनी या शाळेच्या शिक्षक- पालक सभेत स्वत: शैक्षणिक साहित्यापासून तयार केलेल्या राखीचे सादरीकरण केले.
गोरख सानप यांनी वह्यांचे पुठ्ठे, ड्रेसेचे रिकामे खोके, टीव्ही, फ्रीज यांचे रिकामे खोके यांचा वापर करून अतिशय कमी खर्चात टाकाऊ वस्तूंचा वापर करून पर्यावरणपूरक टिकाऊ शैक्षणिक साहित्यातून राखी तयार करून उपस्थित संस्थाचालक, पालक, विद्यार्थी यांची मने जिंकली. या शैक्षणकि साहित्याच्या राखीचे उद्घाटन न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील कराड, सचिव रतन वडघुले, संस्थापक विश्वस्त वि. दा. व्यवहारे, आदि मान्यवरांच्या हस्ते झाले. कमी खर्चात विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त अध्ययन अनुभूती देणाºया या शैक्षणिक राखीमध्ये संख्याज्ञान, समान अर्थाचे शब्द, विरूद्ध अर्थाचे शब्द, अलंकारिक शब्द, इंग्रजी शब्द व चित्रकार्ड, मनोरंजक शब्द खेळ, बाराखडी अक्षर कार्ड, जादूची डबी, जादूचे फूल, द्विमीती चित्र, संख्याकार्ड, चित्र कार्ड, दशक माळ, शतक माळ, पाढ्यांच्या पट्या, रिकाम्या व वाया गेलेल्या पाण्याच्या बाटलीच्या झाकणांचा वापर करून तयार केलेल्या कृतीयुक्त शैक्षणीक साहित्याची माहीती पालकांनी जाणून घेतली. मुख्याध्यापक अलका जाधव यांनी प्रास्ताविक केले . संजय जाधव यांनी शाळेत राबविल्या जाणाºया विविध उपक्र मांची माहिती दिली. प्रतिभा खैरनार यांनी अभ्यासक्र माची ओळख करून दिली तर गोरख सानप यांनी मूल्यमापन पद्धती पालकांना समजावून सांगितली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील कराड , संस्थापक विश्वस्त वि.दा.व्यवहारे यांची भाषणे झाली . कार्यक्र माचे सूत्रसंचालन कल्पना पेठे यांनी केले. किरण खैरनार यांनी आभार मानले.

Web Title: Sanap, a teacher of Ventee, is an academic teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.