पक्षांतर्गत विरोधकांना सानप यांचा दणका

By admin | Published: August 30, 2016 01:52 AM2016-08-30T01:52:10+5:302016-08-30T01:52:10+5:30

गुन्हेगारांना आश्रय : नेतृत्वावर शिक्कामोर्तब

Sanap's bribe to opposition opponents | पक्षांतर्गत विरोधकांना सानप यांचा दणका

पक्षांतर्गत विरोधकांना सानप यांचा दणका

Next

मंचर : बेकायदेशीररीत्या मुरूम उत्खनन सुरू असताना तलाठी पंचनामा करण्यास गेले असता त्यांच्यावर दगडाने हल्ला करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. उत्खननाचे फोटो मोबाईलमध्ये काढण्यात आल्याने मोबाईलही फोडण्यात आला. ही घटना शेवाळवाडी गावच्या हद्दीत रात्री पावणेअकरा वाजता घडली. याप्रकरणी सागर नवनाथ थोरात, जेसीबी व डंपर चालकाविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंचरचे गावकामगार तलाठी हेमंत भागवत यांना तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी फोनवरून कळविले, की मंचर हद्दीत गोरक्षनाथ टेकडीच्या पायथ्याशी बेकायदा बिगरपरवाना मुरूम उत्खनन सुरू आहे. त्यानंतर भागवत गोरक्षनाथ टेकडीच्या पायथ्याशी रात्री गेले. त्या वेळी पेठ येथील तलाठी उद्धव चव्हाण तेथे आले. दोघांनी पाहणी केली असता जेसीबीद्वारे मुरूम काढून तो डंपरमध्ये भरला जात होता. तलाठी चव्हाण यांनी त्याचे फोटो मोबाईलमध्ये काढले. जागामालक कोण आहे अशी चौकशी करत असताना सागर नवनाथ थोरात हा पुढे आला.
तुमच्याकडे मुरूम उत्खननासाठी परवाना आहे का, अशी चौकशी केली असता, थोरात यांनी परवाना नसल्याचे सांगितले. तुम्ही बेकायदेशीरपणे मुरूम काढत आहात, जेसीबी डंपर पोलीस ठाण्यात घ्या, असे तलाठी यांनी सांगितले. त्या वेळी थोरात यांना राग आला. तलाठी भागवत व चव्हाण यांना अरेरावी करण्यात आली. तुमची कामाची वेळ सकाळ ते संध्याकाळ आहे, रात्रीची नाही, आम्ही जेसीबी, डंपर पोलीस ठाण्यात घेणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, आमचे कोणी काही करू शकत नाही, असे म्हणून सागर थोरातने दोघांना शिवीगाळ दमदाटी व जिवे मारण्याची धमकी दिली.
सागर थोरातने तेथील दगड दोन्ही हाताने उचलून जिवे मारण्याच्या उद्देशाने तलाठी चव्हाण यांच्या डोक्यात घालणार, तेवढ्यात चव्हाण यांनी दगडाचा घाव चुकविल्याने त्यांच्या डाव्या पायाच्या मांडीवर दगड लागून किरकोळ जखम होऊन त्यांना मुकामार लागला आहे. तलाठी चव्हाण यांनी मोबाईलच्या साह्याने काढलेले फोटो नष्ट करण्याच्या उद्देशाने सागरने मोबाईलवर दगड मारून नुकसान केले. सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी तलाठी हेमंत भागवत यांनी पोलिसांत फिर्याद दिली. (वार्ताहर)

Web Title: Sanap's bribe to opposition opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.