‘सनातन’, ‘सिमी’वर बंदीसाठी धरणे
By admin | Published: September 26, 2015 10:25 PM2015-09-26T22:25:00+5:302015-09-26T22:25:00+5:30
‘सनातन’, ‘सिमी’वर बंदीसाठी धरणे
नाशिकरोड : डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्त्या करणारी संशयित संस्था सनातन व जातीयवाद पसरविणाऱ्या सिमी संघटना यांच्यावर बंदी घालावी, या मागणीसाठी पीपल्स रिपाइंच्या वतीने शनिवारी दुपारी बिटको चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे या पुरोगामी विचारसरणीच्या लोकांवर हल्ला करणारी सनातन संस्था असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. जाती-धर्माच्या व वंशाच्या प्रश्नावर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करीत असून दलित, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व इतर शोषित पीडित जनतेवर अत्याचार होत आहे. दाभोलकर व पानसरे यांची हत्त्या करणाऱ्या संशयित सनातन संस्था व जातीयवाद पसरविणाऱ्या सिमी संघटनेवर बंदी घालावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी
केली.
धरणे आंदोलनात शशिकांत उन्हवणे, राहुल तुपलोंढे, हरिभाऊ जाधव, महादेव खुडे, नंदू जाधव, संदीप काकळीज, नवनाथ कातकाडे, प्रवीण निकम, रवि खरात, नीलेश उन्हवणे, देवीदास डोके, राजू खरात, मुरलीधर घोरपडे, प्रकाश साडे, अमोल कटारे, विलास वानखेडे, मिलिंद शेजवळ, सीताबाई कातकाडे, अलका निकम, सुनीता कर्डक, विमल गायकवाड आदि सहभागी झाले
होते. (प्रतिनिधी)