जिल्ह्यात २२५ अंगणवाडी नवीन इमारतींना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 01:07 AM2021-03-06T01:07:40+5:302021-03-06T01:08:36+5:30
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने चालू आर्थिक वर्षातील आपले नियोजन पुर्ण केले असून, जिल्हा नियोजन मंडळाकडून प्राप्त झालेल्या सुमारे २१ कोटी रूपयांच्या निधीतून ग्रामीण भागातील आदिवासी व बिगर तालुक्यात २२५ अंगणवाड्यांसाठी नवीन इमारत बांधण्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती सभापती अश्विनी आहेर यांनी दिली आहे.
नाशिक : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने चालू आर्थिक वर्षातील आपले नियोजन पुर्ण केले असून, जिल्हा नियोजन मंडळाकडून प्राप्त झालेल्या सुमारे २१ कोटी रूपयांच्या निधीतून ग्रामीण भागातील आदिवासी व बिगर तालुक्यात २२५ अंगणवाड्यांसाठी नवीन इमारत बांधण्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती सभापती अश्विनी आहेर यांनी दिली आहे.
जिल्हा नियोजन मंडळाकडून बिगर आदिवासी भागातील अंगणवाड्यांसाठी पाच कोटी ६१ लाख रूपये तर आदिवासी भागासाठी १४ कोटी ९४ लाख, ६० हजार रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला होता. त्याचे नियोजन करतांना महिला व बालकल्याण विभागाने जिल्हा परिषदेच्या प्रत्येक सदस्याच्या गटात एक अंगणवाडी मंजूर केली असून, आदिवासी भागातील अंगणवाडी बांधकामासाठी ९ लाख, ४० हजार व बिगर आदिवासी भागासाठी साडेआठ लाख रूपये खर्च गृहीत धरण्यात आला आहे.
त्यानुसार २२५ अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी प्रशासकीय मंजुरीही देण्यात आली असून, सभापती आहेर यांनी प्रत्येक सदस्याला पत्र पाठवून त्यांच्या तालुका व गटात मंजुर झालेल्या अंगणवाड्यांची यादी देखील दिली आहे.
तालुकानिहाय
मंजूर अंगणवाडी
बागलाण- ३१, देवळा-०६, कळवण-१५, सुरगाणा-१८, पेठ-०२, दिंडोरी- १७, चांदवड-१२, त्र्यंबकेश्वर- ४०, इगतपुरी-४०, मालेगाव- ०६, नांदगाव-०५, येवला-१३, निफाड- ०९, नाशिक- ०२, इगतपुरी-०२, सिन्नर- ०७