पाथरेला ८५ लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:11 AM2021-05-31T04:11:36+5:302021-05-31T04:11:36+5:30

तीन महिन्यांपूर्वी पाथरे बुद्रुक ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सुजाता नरोडे यांची निवड झाली. गावात विकासकामे मंजूर होण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे व ...

Sanction for development works worth Rs. 85 lakhs | पाथरेला ८५ लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी

पाथरेला ८५ लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी

googlenewsNext

तीन महिन्यांपूर्वी पाथरे बुद्रुक ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सुजाता नरोडे यांची निवड झाली. गावात विकासकामे मंजूर होण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे व जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे यांच्याकडे त्यांनी पाठपुरावा केला. स्थानिक विकास निधी अंतर्गत निवृत्तीनाथ मंदिरासाठी २५ लाख रुपये, क्रीडा विभागाकडून ग्रीन जीमसाठी २० लाख रुपये, जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे यांच्या पाठपुराव्यातून शिवारातील अंतर्गत रस्त्यांसाठी १० लाख रुपये, सेस निधीतून धोबीघाटासाठी ५ लाख रुपये, पंचायत समिती सदस्य योगिता कांदळकर यांच्या सेस निधी अंतर्गत गटार बांधकाम करण्यासाठी अडीच लाख रुपये व चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगांतर्गत २२ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. मंजूर कामे लवकरच सुरू होणार आहेत. यासाठी सरपंच सुजाता नरोडे, उपसरपंच रवींद्र चिने, ग्रामपंचायत सदस्य स्वाती नरोडे, कुसुम रहाटळ, प्रतिभा चिने, मनीषा बिडवे, भारती गीते, निकिता थोरात, वाल्मीक माळी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

चौकट-

तरुणांसाठी अभ्यासिका

पाथरे बुद्रुक गावालगत पाथरे खुर्द व वारेगाव ही गावे आहेत. शेजारी कोळगावमाळ व मिरगाव ही खेडी आहेत. वरिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या युवकांची या भागात मोठी संख्या आहे. यातील काही युवक व युवती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. त्यांना गावात अभ्यासाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आमदार कोकाटे यांच्याकडे अभ्यासिका व लायब्ररीची मागणी केली होती. त्यानुसार आमदार कोकाटे यांनी प्रस्ताव बनवून तो जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजुरीसाठी पाठविला असून महिनाभरात या गावासाठी ३० लाख रुपयांची इलेक्ट्रॉनिक लायब्ररी व अभ्यासिका मंजूर होणार आहे. क्रीडा विभागांतर्गत मंजूर झालेली २० लाख रुपयांची ग्रीन जीम श्रीकृष्ण मंदिरासमोरील पटांगणात होणार असून ही सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील सर्वात मोठी जीम असणार आहे.

कोट....

ग्रामपंचायतच्या माध्यमातून अवघ्या तीन महिन्यांत सुमारे ८५ लाख रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. पर्यावरणाचे संवर्धन करण्याबरोबरच लोकांच्या शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीस साहाय्य ठरतील अशी कामे करण्याबरोबरच रोजगार वाढीस उपयोगी ठरतील अशी विकासकामे करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

- सुजाता नरोडे, सरपंच

फोटो ३० सुजाता नरोडे पाथरे

===Photopath===

300521\30nsk_25_30052021_13.jpg

===Caption===

फोटो ३० सुजाता नरोडे पाथरे 

Web Title: Sanction for development works worth Rs. 85 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.