आश्रमशाळा कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 12:49 AM2018-08-04T00:49:59+5:302018-08-04T00:50:24+5:30
नाशिक : शासकीय आश्रमशाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रोजंदारी, तासिका पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाºयांना सेवेत सामावून घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतरही आश्रमशाळेत भरती आणि बदलीप्रक्रिया सुरू झाल्याने रोजंदारी कर्मचाºयांनी येत्या दि. २१ पासून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नाशिक : शासकीय आश्रमशाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रोजंदारी, तासिका पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाºयांना सेवेत सामावून घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतरही आश्रमशाळेत भरती आणि बदलीप्रक्रिया सुरू झाल्याने रोजंदारी कर्मचाºयांनी येत्या दि. २१ पासून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहांमध्ये अनेक वर्षांपासून पदनिहाय पात्रता धारण केलेले कर्मचारी अल्पशा मानधनावर कामकाज करीत आहेत. विशेष बाब म्हणून या कर्मचाºयांना सेवेत कायम करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आदेशदेखील दिले होते; मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून संबंधित विभागातील अधिकाºयांनी भरती आणि बदलीप्रक्रिया राबविण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे रोजंदारी कर्मचाºयांचा प्रश्न मागे पडून सेवेत कायम करण्याचा प्रश्न मागे पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या मार्च महिन्यात रोजंदारी कर्मचाºयांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. यावेळी मुख्य सचिव, वित्त विभागाचे सचिव, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव, सहसचिव, आयुक्त यांच्याबरोबर बैठक झाली होती.
यावेळी संघटनेने तीन महिन्यांची मुदत देऊन मागण्या सोडविण्याची विनंती केली होती. यावेळी रोजंदारी कर्मचाºयांना तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण
करून त्यांना कायम सेवेत सामावून घेतले जाईल असे ठरविण्यात
आले होते; मात्र आता या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप रोजंदारी वर्ग-३, वर्ग-४ कर्मचारी संघर्ष संघटनेने केला आहे. याप्रकरणी तत्काळ निर्णय न घेतल्यास दि. २१ पासून आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. चांदवड सोग्रस फाटा येथून पदयात्रा करीत बिºहाड आंदोलन आयुक्तालयावर करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आदिवासी विकास आयुक्तांना दिलेल्या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष रितेश ठाकूर, महेश पाटील, कमलाकर पाटील, संदीप देवरे, सचिन वाघ, रमण ठाकरे, भगतसिंग पाडवी, संजय जाधव, विजय बागुल, राजाराम बागुल आदींच्या स्वाक्षरी आहेत.
जानेवारीपासून वेतनापासून वंचित
रोजंदारी कर्मचारी जानेवारी २०१८ पासून वेतनापासून वंचित आहेत. यामुळे कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी तीन महिन्यांचे आश्वासन देऊन आता पाच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने कर्मचाºयांमध्ये नाराजी आहे.