बांधकाम साइटवरील वाळूचे पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:20 AM2017-10-26T00:20:58+5:302017-10-26T00:21:05+5:30

जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरील वाळू ठिय्यांचे अद्याप लिलाव झालेले नसतानाही शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असून, या बांधकामासाठी वाळू व खडी कोठून आणली गेली, असा प्रश्न पडलेल्या नाशिक तहसील कार्यालयाने नाशिक शहरासह तालुक्यातील सर्वच बांधकाम ठिकाणांना भेटी देऊन तेथील खडी व वाळूचे पंचनामे करून संबंधिताना दंडाच्या नोटिसा बजावल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

The sand panchnama on the construction site | बांधकाम साइटवरील वाळूचे पंचनामे

बांधकाम साइटवरील वाळूचे पंचनामे

Next

नाशिक : जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरील वाळू ठिय्यांचे अद्याप लिलाव झालेले नसतानाही शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असून, या बांधकामासाठी वाळू व खडी कोठून आणली गेली, असा प्रश्न पडलेल्या नाशिक तहसील कार्यालयाने नाशिक शहरासह तालुक्यातील सर्वच बांधकाम ठिकाणांना भेटी देऊन तेथील खडी व वाळूचे पंचनामे करून संबंधिताना दंडाच्या नोटिसा बजावल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नवीन प्रकल्पांचा शुभारंभ करण्याची तयारी केली जात असल्याने प्रशासनाच्या या नोटिसांमुळे नवीन कामांना खीळ बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  चार महिन्यांपूर्वी नाशिकच्या प्रांत अधिकाºयांनी पेठेनगर येथे वाळूच्या वाहनांवर मोठी कारवाई केली, परंतु वाळू वाहतूकदारांनी त्या विरुद्ध अपील दाखल केल्याने दंडात्मक कारवाईतून सदरची वाळू जप्त करण्याची कार्यवाही करण्यात आली. मात्र त्यानंतरही शहरात मोठ्या प्रमाणावर वाळूची वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारींची दखल घेत मोहीम हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
पाचपट दंडाच्या नोटिसा
वाळू व खडीचा साठा करणाºयांकडे तहसील कार्यालयाने ते खरेदी केल्याच्या पावत्याही मागितल्या असून, त्या न दिल्याने आता उपलब्ध साठ्यावर पाच पट दंड आकारणीच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. येत्या सात दिवसांत खुलासा न केल्यास दंड वसुलीची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याने नागरिकांची धावपळ उडाली आहे. मात्र असाच प्रकार कळवणच्या तत्कालीन प्रांत अधिकाºयांनी कळवण शहरात केला असता प्रकरण त्यांच्या अंगलट आल्याने प्रशासनाला माघार घ्यावी लागली होती.
 मुळात नाशिक विभागात अद्याप एकाही जिल्ह्यातील वाळू ठिय्यांचा लिलाव झालेला नसतानाही नवीन बांधकामांसाठी वाळू कोठून उपलब्ध झाली याचे कोडे पडलेल्या नाशिक तहसील कार्यालयाने शहर व परिसर पिंजून काढत नवीन बांधकामे शोधली.
 या बांधकामांवर असलेली खडी, वाळू याबाबत त्यांनी संबंधिताना विचारणा केली, परंतु त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळू शकली नाहीत. शहरातील पाथर्डी, मखमलाबाद, गंगापूररोड, पंचवटी, नाशिकरोड, चेहेडी, म्हसरूळ, सातपूर, सिडको आदी भागातील जवळपास १२७ ठिकाणांना तलाठी व मंडळ अधिकाºयांनी भेटी देऊन प्रत्यक्ष उपलब्ध असलेल्या वाळू व खडी साठ्याचे पंचनामे केले आहेत.
यात प्रामुख्याने शहरातील नवीन बांधकाम प्रकल्पांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असून, काही किरकोळ स्वरूपाचे काम करणाºया कामांच्या ठिकाणीही मिळालेल्या सुमारे ४५ हजार ब्रास वाळूचा पंचनामा करण्यात आला आहे.

Web Title: The sand panchnama on the construction site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.