तहसीलदारांच्या पथकावर घातला वाळूचा ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 01:42 AM2018-11-24T01:42:18+5:302018-11-24T01:42:44+5:30

सटाणा तालुक्यात वाळूमाफियांनी पुन्हा डोके वर काढले असून, मोसम नदीपात्रात वाळूच्या चोरट्या वाहतुकीला मज्जाव करणाऱ्या तहसीलदारांच्या पथकावर वाळूचा ट्रॅक्टर घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Sand tractor placed on the tahsildar's team | तहसीलदारांच्या पथकावर घातला वाळूचा ट्रॅक्टर

तहसीलदारांच्या पथकावर घातला वाळूचा ट्रॅक्टर

Next
ठळक मुद्देसटाणा : मोसम नदीपात्रात बेकायदा वाळू उपसा

सटाणा : तालुक्यात वाळूमाफियांनी पुन्हा डोके वर काढले असून, मोसम नदीपात्रात वाळूच्या चोरट्या वाहतुकीला मज्जाव करणाऱ्या तहसीलदारांच्या पथकावर वाळूचा ट्रॅक्टर घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर प्रकार गुरुवारी (दि. २२) रात्री घडला. वाळूमाफिया मात्र ट्रॅक्टर सोडून पसार झाला असून, पथकाने एका ट्रकसह दोन ट्रॅक्टर जप्त केले आहेत.
तालुक्यात निर्माण झालेली अभूतपूर्व भीषण पाणीटंचाई लक्षात घेता बागलाणचे तहसीलदार प्रमोद हिले यांनी सर्वप्रथम नदी, नाल्यांमध्ये सुरू असलेला बेसुमार वाळू उपसा रोखण्यावर भर दिला आहे. त्यासाठी वाळूतस्करीविरोधी पथकेदेखील निर्माण केली आहेत. ठिकठिकाणी छापे टाकून वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्याचे काम प्रशासनातर्फे सुरू असताना गुरुवारी रात्रीच्या सुमारास वाळूतस्करीविरोधी पथक गस्तीवर असताना जायखेडानजीक मोसम नदीपात्रात वाळूचे बेकायदेशीर उत्खनन करून ट्रॅक्टरमध्ये भरताना रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न पथकाने केला. मात्र वाळूमाफियांनी या पथकावरच वाळूने भरलेला ट्रॅक्टर घालून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. पथकातील पुरवठा अधिकारी मेजर मोरे, मंडल अधिकारी अहिरे, तलाठी बागुल यांनी सिनेस्टाइल पाठलाग करून ट्रॅक्टर पकडला. यावेळी वाळूमाफिया सागर अंबर सोनवणे व त्याचे सहा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. दरम्यान, याच पथकाने आरम नदीपात्रातही छापे टाकले. मोरेनगर येथे न्यू हॉलंड कंपनीचा वाळूने भरलेला एक ट्रॅक्टर तसेच नामपूर-लखमापूर रस्त्यावर नाशिककडे वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रक सापळा रचून पकडण्यात आला.
वाळूतस्करीविरोधी पथकावर ट्रॅक्टर घालणाºया वाळूमाफियांविरु द्ध अद्याप पोलिसांकडे तक्र ार न केल्याने उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. मात्र या पथकाने दंडात्मक कारवाई केली असून, सात लाख वीस हजार रु पयांचा दंड तहसीलदार प्रमोद हिले यांनी ठोठावला आहे.

Web Title: Sand tractor placed on the tahsildar's team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.