भरदुपारी बंगल्यातून  चंदनवृक्ष केला गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 12:44 AM2021-01-11T00:44:20+5:302021-01-11T00:44:43+5:30

बंगल्याच्या आवारातील चंदनाचे वृक्ष अज्ञात चोरट्यांनी भरदुपारच्या सुमारास कापून चोरी केल्याची घटना नाशिक रोड परिसरात घडली.

Sandalwood tree disappeared from Bhardupari bungalow | भरदुपारी बंगल्यातून  चंदनवृक्ष केला गायब

भरदुपारी बंगल्यातून  चंदनवृक्ष केला गायब

Next

नाशिक : बंगल्याच्या आवारातील चंदनाचे वृक्ष अज्ञात चोरट्यांनी भरदुपारच्या सुमारास कापून चोरी केल्याची घटना नाशिक रोड परिसरात घडली. या प्रकरणी दिग्विजय  मोहन धुरू (रा. जयाभाई कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात अज्ञात चंदनचोरांविरुद्ध गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. 
पाथर्डीत अवैध  दारूविक्री रोखली
नाशिक : पाथर्डी गावात राहत्या घराच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या भूखंडावर अवैधरीत्या देशी दारूची होणारी विक्री इंदिरानगर पोलिसांनी छापा टाकून रोखली आहे. पोलिसांनी या प्रकरणी संशयित दिलीप  शिवराम मोरे (रा.पाथर्डी गाव) यास ताब्यात घेत, त्याच्याकडून प्रिन्स संत्रा या देशी दारून ८ बाटल्या  जप्त केल्या आहेत. संशयित मोरे हा चोरट्या मार्गाने विक्री करत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. 
मल्हारखाण येथून  तडीपार गुंड ताब्यात
नाशिक : सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगारास राकेश सुभाष साळुंखे (रा.मल्हारखाण) यास शहरासह जिल्ह्यातून वर्षभरासाठी तडीपार करण्यात आले. मात्र, तो शहरा व परिसरात सर्रासपणे वावरत होता. त्यास पोलिसांनी मल्हाणखाण झोपडपट्टीतून ताब्यात घेतले. 
भारतनगरमधून  तडीपार गुंडांना अटक
नाशिक : मुंबई नाका पोलिसांनी  वडाळा रोडवरील भारतनगर भागातून संशयित वसीम अब्दुल रहेमान शेख (रा.  भारतनगर)  या तडीपार गुंडाला अटक केली आहे. वसीम याला वर्षभरासाठी तडीपार करण्यात आले होते, त्याचप्रमाणे, संशयित सोहेल उर्फ बाबू पप्पू खान रजिउल्लाअन्सारी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोहेल दोन वर्षांकरिता हद्दपार होता.

Web Title: Sandalwood tree disappeared from Bhardupari bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.