उन्हाळी कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 06:21 PM2018-11-23T18:21:01+5:302018-11-23T18:21:24+5:30
कसमादे परिसरातील शेतकºयांचे प्रमुख आणि हक्काचे पीक म्हणून ओळख असलेल्या कांद्याने सध्यातरी शेतकºयांचा वांधा केल्याचे चित्र असून, भाववाढीच्या अपेक्षेने वर्षभर सांभाळलेला अर्धा चाळीतच सडला तर उरलेला अर्धा कवडीमोल दराने विकला जात असल्यामुळे उत्पादन खर्च निघणेदेखील कठीण झाल्याने आर्थिक गणित बिघडले असून, पुन्हा एकदा बळीराजा कर्जाच्या खायीत लोटला जात आहे.
वटार : कसमादे परिसरातील शेतकºयांचे प्रमुख आणि हक्काचे पीक म्हणून ओळख असलेल्या कांद्याने सध्यातरी शेतकºयांचा वांधा केल्याचे चित्र असून, भाववाढीच्या अपेक्षेने वर्षभर सांभाळलेला अर्धा चाळीतच सडला तर उरलेला अर्धा कवडीमोल दराने विकला जात असल्यामुळे उत्पादन खर्च निघणेदेखील कठीण झाल्याने आर्थिक गणित बिघडले असून, पुन्हा एकदा बळीराजा कर्जाच्या खायीत लोटला जात आहे.
कांद्याचे दर दररोज घसरत असल्याने शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आले आहे. मागील वर्षी कांद्याला चांगला दर मिळाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी उन्हाळी कांदा चाळीत साठवून ठेवला; मात्र कांद्याचे बाजार कोसळल्याने आता कांदा सरासरी ३०० ते ४०० रु पये प्रतिक्विंटल दराने विक्र ी होत आहे. या विक्र ीतून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकºयांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे.
फेब्रुवारी-मार्च महिन्यात साठविलेला कांदा नऊ महिन्यांनी शेतकरी बाजारात विक्र ीसाठी आणत आहे. या कांद्याला मार्च महिन्याच्या तुलनेत नगण्य भाव मिळत असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. यंदा कांद्याने पूर्ण वर्षाचे गणित बिघडविले असल्याची भावना शेतकºयांमध्ये आहे. मागील वर्षी याच कांद्याला दोन हजारापर्यंत भाव मिळाला होता. यंदा सद्यस्थितीत सरासरी ३०० ते ४०० रु पये दर कांद्याला मिळत आहे.
गेल्या वर्षी लाल कांद्याला चांगला भाव मिळाला. यंदा पन्नास टक्के उत्पादन घटलेले असताना लाल कांद्याच्या दरानेदेखील माना टाकल्या आहेत.
साठविलेल्या कांद्याला आज मातीमोल भाव
फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून शेतकºयांनी उन्हाळी कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. मार्च महिन्यात कांद्याला सर्वसाधारण भाव हा ७०० ते ८०० रु पये इतका होता. आज हा कांदा बाजारात विक्र ीसाठी आणला जात आहे. त्याला ३०० ते ४०० रु पये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. साठविलेल्या कांद्याला आज मातीमोल भावाने विकला जात आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात उन्हाळी कांद्याला उच्चांकी भाव चार हजार
रु पयापर्यंत गेला होता.
यंदाही चांगला भाव मिळेल या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात कांदाचाळीत साठवणूक केली होती; मात्र सरकारने शेतकºयांना अच्छे दिन दाखवत याच दिवसात चार हजार रु पये जाणारा कांदा चारशे रु पयांवर आणून ठेवल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. चालू वर्षी फक्त आॅक्टोबर महिन्यात फक्त तीनच दिवस कांद्याला सरासरी दोन हजारपेक्षा जास्त बाजारभाव मिळाला; मात्र त्यानंतर आजपर्यंत कांद्याच्या दरात एका पैशाचीसुद्धा वाढ झाली नसून कसमादेतील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी ३०० ते ४०० रु पयांचा दर मिळत आहे.