संदीप वाजे म्हणतो, हवं तर माझी नार्को टेस्ट करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 01:03 AM2022-02-17T01:03:24+5:302022-02-17T01:04:51+5:30
नाशिक महापालिकेतील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे हत्या प्रकरणात त्यांचे पती संदीप वाजे यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी संशयित म्हणून अटक केली होती. मात्र, संदीप वाजे १३ दिवस पोलीस कोठडीत असताना नाशिक ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात एकही ठोस पुरावा सादर न केल्याने संदीप वाजे यास इगतपुरी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामुळे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दरम्यान, वाजे याने न्यायालयात मी गुन्हा केला असेल तर माझी नार्को टेस्ट करा, अशी मागणी केल्याचे त्याच्या वकिलांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
इगतपुरी : नाशिक महापालिकेतील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे हत्या प्रकरणात त्यांचे पती संदीप वाजे यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी संशयित म्हणून अटक केली होती. मात्र, संदीप वाजे १३ दिवस पोलीस कोठडीत असताना नाशिक ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात एकही ठोस पुरावा सादर न केल्याने संदीप वाजे यास इगतपुरी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामुळे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दरम्यान, वाजे याने न्यायालयात मी गुन्हा केला असेल तर माझी नार्को टेस्ट करा, अशी मागणी केल्याचे त्याच्या वकिलांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
डॉ. सुवर्णा वाजे प्रकरणी त्यांचे पती संदीप वाजे तब्बल १३ दिवस पोलीस कोठडीत होते. मात्र, या १३ दिवसांत ग्रामीण पोलिसांना एकही ठोस पुरावा न्यायालयात सादर करता आला नाही, अशी माहिती संशयित आरोपीचे वकील ॲड. दिलीप खातळे यांनी दिली. त्यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या तपासकार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ४ ते ५ संशयित आणखी असण्याची शक्यता नाशिक ग्रामीण पोलिसांनी वर्तवली होती. मात्र आतापर्यंत डॉ. सुवर्णा वाजे यांचे पती सोडून एकही संशयित पकडण्यास नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आले नसल्याचेही सांगितले. एकही ठोस पुरावा पोलिसांना न्यायालयासमोर सादर करता न आल्याने संशयितास आज न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी सुवर्णा वाजे यांचा मृतदेह वाडीवऱ्हे शिवारात गाडीसह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. या प्रकरणात त्यांचे पती संदीप जाधव यास पोलिसांनी अटक केली होती. मात्र, १४ दिवसांमध्ये पोलीस काहीही निष्पन्न करू शकले नाहीत.