निमगाव-सिन्नरच्या सरपंचपदी सांगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 23:56 IST2020-01-05T23:56:33+5:302020-01-05T23:56:55+5:30
निमगाव-सिन्नर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता अमृतराव सांगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच जयसिंह नागरे यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सरपंचपदाच्या रिक्त जागेसाठी निवड करण्यासाठी अध्यासी अधिकारी तथा मंडळ अधिकारी पी. डी. पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक बोलाविण्यात आली होती.

सिन्नर तालुक्यातील निमगाव-सिन्नर ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता सांगळे यांच्या सत्कारप्रसंगी जयसिंह नागरे, अमृता सांगळे, संजय सानप, विमल सानप, शोभा सानप, सचिन सानप, कविता सानप, छाया सानप, बाळू चंद्रमोरे आदी.
सिन्नर : तालुक्यातील निमगाव-सिन्नर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता अमृतराव सांगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंच जयसिंह नागरे यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सरपंचपदाच्या रिक्त जागेसाठी निवड करण्यासाठी अध्यासी अधिकारी तथा मंडळ अधिकारी पी. डी. पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक बोलाविण्यात आली होती.
सरपंचपदासाठी निर्धारित वेळेत सुनीता सांगळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यावर सूचक म्हणून माजी सरपंच संजय सानप तर अनुमोदक म्हणून जयसिंग नागरे यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. छाननी प्रक्रियेत सांगळे यांचा अर्ज वैध ठरल्याने निवडणूक अधिकारी पवार यांनी सरपंचपदी सुनीता सांगळे यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.