सटाणा उपनगराध्यक्षपदी संगीता देवरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 01:45 AM2018-04-28T01:45:37+5:302018-04-28T01:45:37+5:30
येथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीच्या संगीता देवरे यांची शुक्रवारी (दि.२७) बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी तहसीलदार जे.पी. कुवर तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी काम पाहिले.
सटाणा : येथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीच्या संगीता देवरे यांची शुक्रवारी (दि.२७) बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी तहसीलदार जे.पी. कुवर तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी काम पाहिले.पालिकेच्या मावळत्या उपनगराध्यक्षा सुवर्णा नंदाळे यांनी आवर्तनानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी पालिका सभागृहात निवडणूक प्रक्रि या पार पडली. उपनगराध्यक्ष पदासाठी संगीता देवरे यांच्या नावाची सूचना नगरसेवक महेश देवरे यांनी आणली. त्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते काकाजी सोनवणे यांनी अनुमोदन दिले. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत देवरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कुवर यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.निवडीचे वृत्त सभागृहाबाहेर येताच देवरे यांचे समर्थक व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. नंदाळे यांनी नूतन उपनगराध्यक्षा देवरे यांच्याकडे कार्यभार सुपूर्द केला. तर नगराध्यक्ष सुनील मोरे व मुख्याधिकारी हेमलता डगळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन देवरे यांचा सत्कार करण्यात आला. शहर विकासाकरीता शासनाच्या विविध योजना राबविणार असून शहरवासियांना मुलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे देवरे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. देवरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर देवरे यांची ढोल ताशांच्या गजरात चार फाटा ते मल्हार रोडपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शहर विकास आघाडीचे गटनेते राकेश खैरनार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते काकाजी सोनवणे, कॉंग्रेसचे गटनेते दिनकर सोनवणे, नगरसेवक राहुल पाटील, दीपक पाकळे, महेश देवरे, आरिफ शेख, बाळासाहेब बागुल, नगरसेविका सुलोचना चव्हाण, डॉ. विद्या सोनवणे, सुरेखा बच्छाव आदींसह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.