संघर्षाची अनुभूती देणारा काव्यसंग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 05:56 PM2019-01-15T17:56:54+5:302019-01-15T17:57:06+5:30
सिन्नर : कवी मधुकर जाधव यांनी लिहीलेल्या ‘धर्म आणि धम्म संघर्षा’ची या काव्यसंग्रहात संघर्षाची अनुभूती मिळते, असे मत जेष्ठ समीक्षक मोतीराम कटारे यांनी व्यक्त केले.
सिन्नर : कवी मधुकर जाधव यांनी लिहीलेल्या ‘धर्म आणि धम्म संघर्षा’ची या काव्यसंग्रहात संघर्षाची अनुभूती मिळते, असे मत जेष्ठ समीक्षक मोतीराम कटारे यांनी व्यक्त केले.
येथील कवी मधुकर जाधव यांच्या ‘फ्रंटलाइन लढा’ या कवितासंग्राहाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपिठवर मुंबई विद्यापिठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. श्याम गरूड, समीक्षक देवेंद्र उबाळे, ज्येष्ठ साहित्यिक किशोर पाठक, कवी मधुकर जाधव आदी उपस्थित होते.
आजवरच्या सर्वच चळवळीत महिलांना गृहीत धरले असून, त्यांचे स्वतंत्र अस्तित्व नाकारले असल्याने पुरूषी मानसिकतेने महिलांना गर्दीतील एक चेहरा एवढेच स्थान दिल्याचे डॉ. श्यामल गरूड यांनी सांगितले. ‘फ्रंटलाइन लढा’ हा काव्यसंग्रह महिलांच्या वेदनेचा हुंकार असून, सर्वच स्तरावरील महिलांच्या दु:खाची दखल एका पुरूष कविने अतिशय संवेदनशीलपने मांडली असल्याचे ते म्हणाले. या संग्रहातील कविता जातीपातीच्या चौकटी भेदून धर्मनिरपेक्ष पातळीवर स्थिरावल्याचे समीक्षक देवेद्र उबाळे यांनी सांगितले.
सामाजिक भान असलेल्या कविता तळागाळातील अपेक्षितांचे दु:ख चहाट्यावर आणून परिपक्व झाल्याची भावना किशोर पाठक यांनी व्यक्त केली. यावेळी कवि मधुकर जाधव, त्यांच्या पत्नी आशा जाधव यांचा सत्कार करण्यात आला.