मनेगावच्या सरपंचपदी संगिता शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:17 AM2021-02-27T04:17:42+5:302021-02-27T04:17:42+5:30
मनेगाव ग्रामपंचायतीची ११ जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक झाली होती. सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते. गुरुवारी निवडणूक निर्णय अधिकारी के. डी. ...
मनेगाव ग्रामपंचायतीची ११ जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक झाली होती. सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते. गुरुवारी निवडणूक निर्णय अधिकारी के. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक यादव यांच्या उपस्थितीत विशेष सभा पार पडली.
सरपंचपदासाठी सौ. संगिता योगेश शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उपसरपंचपदासाठी छबूराव भोजणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला. निर्धारित वेळेत सरपंच व उपसरपंचपदासाठी प्रत्येकी शिंदे व भोजणे यांचे प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप जेडघुले, सुनिता सोनवणे, कविता आंबेकर आदि सदस्य उपस्थित होते. ११ पैकी ७ सदस्य उपस्थित होते. ४ सदस्य गैरहजर राहिले. सरपंचपदी शिंदे व उपसरपंचपदी भोजणे यांची निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत फटाक्यांची आतषबाजी केली. गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.
फोटो : २६ मनेगाव सरपंच (फोटो आलेला नाही)
सिन्नर तालुक्यातील मनेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. संगिता योगेश शिंदे तर उपसरपंचपदी अॅड. छबूराव भोजणे यांची बिनविरोध निवड झाली. त्याप्रसंगी जल्लोष करतांना नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते.