कासलीवाल विद्यालयास सॅनिटरी नॅपकिन मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 05:51 PM2020-10-29T17:51:12+5:302020-10-29T17:53:06+5:30
नांदगाव : येथील सौ. क. मा. कासलीवाल माध्यमिक विद्यालयास सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन भेट देण्यात आले.
Next
ठळक मुद्दे व्हेंडिंग मशीनमुळे विद्यार्थिनींचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत
नांदगाव : येथील सौ. क. मा. कासलीवाल माध्यमिक विद्यालयास सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन भेट देण्यात आले.
ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थिनींना मासिक पाळीसंदर्भात सामाजिक, आर्थिक समस्या असतात. व्हेंडिंग मशीनमुळे विद्यार्थिनींचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत होईल तसेच हजेरीचे प्रमाण व जागृती वाढणार आहे अशी अपेक्षा मुख्याध्यापक राजेंद्र खरोटे यांनी व्यक्त केली. सुहास कांदे यांच्या आमदार निधीतून हा उपक्रम राबविण्यात आला. उपमुख्याध्यापक गोरख डफाळ, किशोर बागले, राहुल आहेर, संदीप आहेर, रवींद्र चव्हाण, विजय गायकवाड, रूपाली मालकर, योगीता गायकवाड, हर्षदा भालेराव आदी उपस्थित होते.