पेठ येथे सॅनेटरी नॅपकीन प्रकल्प  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 03:21 PM2019-11-21T15:21:43+5:302019-11-21T15:22:03+5:30

पेठ -डांग सेवा मंडळ,नाशिक व शारदा महिला मंडळ,पेठ यांच्या संयुक्त विद्येमाने पेठ येथे सॅनेटरी नॅपिकन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे

 Sanitary napkin project at Peth | पेठ येथे सॅनेटरी नॅपकीन प्रकल्प  

पेठ येथील जनता विद्यालयात सॅनटरी नॅपिकन प्रकल्प शुभारंभ प्रसंगी रिया खानडुरी, डॉ. वंदना सोनवणे, प्राध्यापक डॉ. रत्ना पालुरी, शुभांगी चपळगावकर, समिर कुलकर्णी,हेमलता बिडकर,कल्पना शिरोरे आदी.  

Next
ठळक मुद्दे ग्रामीण भागातील महिलांना उद्योग व महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे या उद्देशाने हा प्रकल्प डांग सेवा मंडळ संस्थेच्या वितने सुरु करण्यात आला. या प्रकल्पासाठी सँडविक कंपनी व सिंबॉसिस कॉलेजचे विद्यार्थी यांनी आर्थिक स्वरूपात सहकार्य केले आहे.



लोकमत न्यूज नेटवर्क

पेठ -डांग सेवा मंडळ,नाशिक व शारदा महिला मंडळ,पेठ यांच्या संयुक्त विद्येमाने पेठ येथे सॅनेटरी नॅपिकन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे
सँडविक कंपनीच्या प्रमुख रिया खानडुरी यांचे हस्ते पेठच्या जनता विद्यालय व कनिष्ट महाविद्यालयात या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्ष हेमलता बिडकर यांनी प्रास्ताविक केले.
याप्रसंगी सिंबॉसिस कॉलेजचे प्राचार्य डॉ. वंदना सोनवणे, प्राध्यापक डॉ. रत्ना पालुरी, शुभांगी चपळगावकर, समिर कुलकर्णी, डांग सेवा मंडळाच्या अध्यक्ष हेमलता बिडकर, प्राचार्य आर.बी.टोचे, मुख्याध्यापक कल्पना शिरोरे यांचे सह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माहिला बचत गटाच्या सदस्या उपस्थीत होते.

 

 

Web Title:  Sanitary napkin project at Peth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.