जिल्हा न्यायालयात महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स वेंडिंग मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:38 AM2018-12-27T00:38:06+5:302018-12-27T00:38:27+5:30
जिल्हा न्यायालयात येणाऱ्या महिला पक्षकार तसेच महिला वकिलांसाठी तीन ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व डिस्पोजल मशीन बसविण्यात आले. प्रधान जिल्हा न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या मशीनचे उद्घाटन करण्यात आले.
नाशिक : जिल्हा न्यायालयात येणाऱ्या महिला पक्षकार तसेच महिला वकिलांसाठी तीन ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व डिस्पोजल मशीन बसविण्यात आले. प्रधान जिल्हा न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या मशीनचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा न्यायालयातील विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात एक तर नवीन इमारतीत दोन मशीन बसविण्यात आले असून, मालेगाव व निफाड न्यायालयातही प्रत्येकी एक मशीन बसवण्यात आले़
प्रधान न्यायाधीश शिंदे यांनी सांगितले की, महिलांना त्यांचे अधिकार असून, त्या विशाखा समितीमार्फतही न्याय मागू शकतात. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व डिस्पोजल मशीन आवश्यक आहे़ जिल्हाधिकाºयांना याबाबतचा प्रस्ताव देताच त्यांनी एका दिवसात निधी मंजूर करून न्यायालयाकडे वर्ग केला़ त्यामुळे महिलांची ही गरज तातडीने पूर्ण करता आली.
यावेळी नगरसेवक तथा नाशिक बार असोसिएशनच्या पदाधिकारी अॅड. शामला दीक्षित, अॅड. जालिंदर ताडगे, अॅड. सोनल कदम, अॅड. वैष्णवी कोकणे आदींसह महिला वकील उपस्थित होत्या़