आनंदवाडीत स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 11:14 PM2020-01-09T23:14:53+5:302020-01-09T23:15:30+5:30

स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परम पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने स्वाध्याय परिवार हे वर्ष प्रकृती वर्ष म्हणून राबविणार आहे. त्या निमित्ताने आपण निसर्गाची प्रकृती असणाऱ्या जल, हवा, वृक्ष यांचे संवर्धन आणि घर, परिसर स्वच्छ करणारे प्रयोग राबविणार आहे. ज्या गावात अमृतालयमसारखे प्रयोग सुरू आहे अशा गावात या मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे. निफाड तालुक्यातील चाटोरीच्या आनंदवाडी भागातील वस्तीवर स्वाध्याय परिवारातील कृतिशीलांनी साफ-सफाई, स्वच्छता मोहीम राबविण्यास प्रारंभ केला.

Sanitation campaign in Anandwadi | आनंदवाडीत स्वच्छता मोहीम

निफाड तालुक्यातील आनंदवाडीत स्वच्छता मोहिमेप्रसंगी महिला.

Next

सायखेडा : स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परम पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने स्वाध्याय परिवार हे वर्ष प्रकृती वर्ष म्हणून राबविणार आहे. त्या निमित्ताने आपण निसर्गाची प्रकृती असणाऱ्या जल, हवा, वृक्ष यांचे संवर्धन आणि घर, परिसर स्वच्छ करणारे प्रयोग राबविणार आहे. ज्या गावात अमृतालयमसारखे प्रयोग सुरू आहे अशा गावात या मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे.
निफाड तालुक्यातील चाटोरीच्या आनंदवाडी भागातील वस्तीवर स्वाध्याय परिवारातील कृतिशीलांनी साफ-सफाई, स्वच्छता मोहीम राबविण्यास प्रारंभ केला.
त्याच पार्श्वभूमीवर शेकडो लोकसंख्येची वस्ती असलेल्या चाटोरी येथील आनंदवाडीच्या कृतिशीलांनी प्रकृती पूजन हा उपक्रम राबवून, परिसरातील रस्ते, वस्ती, परिसर स्वच्छ केला. सामाजिक काम किंवा मोहीम म्हणून नाही, तर कचरा भक्तीच्या मार्गाने काढायचा आहे. स्वच्छता संस्कार हा आपल्या जीवनाचा घटक असून, त्याची अंमलबजावणी स्वत:पासून परिवार करीत आहे. झाडांमध्ये वासुदेव म्हणून बघितले पाहिजे. असा संदेश देत, कृतिशीलांनी प्रकृती पूजन या उपक्रमाद्वारे दाखवून दिले. आनंदवाडी येथे जवळ जवळ ७०.७५ कुटुंब असून ४५० लोकवस्ती आहे. याठिकाणी दोन वर्षांपासून लोकनाथ अमृतालायम असून, नियमित उपक्रम राबविण्यात येतात. भक्तिमार्गावरील हा परिवार पंचक्र ोशीतील आपली वेगळी ओळख निर्माण करीत आहे.

Web Title: Sanitation campaign in Anandwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.