कोहोज किल्ल्यावर स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:11 AM2021-06-01T04:11:10+5:302021-06-01T04:11:10+5:30

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव येथील शिवदुर्ग संवर्धन व भ्रमंती या नामांकित संस्थेच्या सदस्यांनी पालघर जिल्ह्यातील इतिहासकालीन कोहोज किल्ल्यावर ...

Sanitation campaign on Kohoj fort | कोहोज किल्ल्यावर स्वच्छता अभियान

कोहोज किल्ल्यावर स्वच्छता अभियान

Next

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव येथील शिवदुर्ग संवर्धन व भ्रमंती या नामांकित संस्थेच्या सदस्यांनी पालघर जिल्ह्यातील इतिहासकालीन कोहोज किल्ल्यावर एकोणतीसावी स्वच्छता मोहीम राबवत येथील परिसर उजळून टाकला. गडावरील लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या व इतर केरकचरा गोळा करत विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शाम गव्हाणे यांनी किल्ल्याविषयी माहिती दिली. कोहोज किल्ल्यावर शिवदुर्ग संवर्धन व भ्रमंती या संस्थेच्या सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबवत गडावरील पुरातन मंदिरे, बुरूज, शिवकालीन पाण्याचे हौद, तसेच मुख्य दरवाजाजवळ मोहीम राबविली. या मोहिमेत शिवदुर्ग संवर्धन व भ्रमंती संस्थेचे अध्यक्ष शाम गव्हाणे, अमित पाटील, विशाल जाधव, मयुर मढवी, चेतन पाटील, गणेश पाटील, प्रशांत भोईर, किरण ठाकरे, अतीष सावंत, प्रसाद पाटील, कुणाल पाटील, चिन्मय पाटील, निशांत पाटील, सुरज पाटील, आकाश पाटील आदी सहभागी झाले होते.

------------

कोहोज किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविताना शिवदुर्ग संवर्धन व भ्रमंती संस्थेचे सदस्य. (३१ नांदूरवैद्य १)

===Photopath===

310521\31nsk_6_31052021_13.jpg

===Caption===

३१ नांदूरवैद्य १

Web Title: Sanitation campaign on Kohoj fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.