पंचवटी परिसरात स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:17 AM2021-02-27T04:17:23+5:302021-02-27T04:17:23+5:30
युगांतर फाऊंडेशनतर्फे शालेय साहित्य नाशिक: उपनगर येथील युगांतर सोशल फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. भा. वि. ...
युगांतर फाऊंडेशनतर्फे शालेय साहित्य
नाशिक: उपनगर येथील युगांतर सोशल फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. भा. वि. जोशी हायस्कूलमध्ये असलेल्या निराधार विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च नगरसेवक सुषमा पगारे आणि रवी पगारे यांनी उचलला आहे. दहावीपर्यंत ते खर्च उचलणार आहेत. याप्रसंगी मुख्याध्यापक सुरेश घरटे उपस्थित होते.
डाव्या कालव्याला पाण्याचे आवर्तन
नाशिक: डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पंचवटी परिसरातून जाणाऱ्या कालव्यातून पाणी वाहत आहे. या पाण्यात परिसरातील मुले पोहण्याचा आनंद घेत आहेत तर काही ठिकाणी महिला वर्ग धुणीभांडी करीत असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन दिवसांपासून पाटाला पाणी वाहत आहे.
टिळकवाडी परिसरात कुत्र्यांचा त्रास
नाशिक: टिळकवाडी परिसरात रात्रीच्या सुमारास मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. या मार्गावर ठिकठिकाणी कुत्र्यांच्या झुंडी वावरत असून या मार्गावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांच्या मागे लागत असल्याने अपघाताची शक्यता आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
रात्रीच्या सुमारास दुचाकी सुसाट
नाशिक: रात्री अकरा ते बारा वाजेच्या सुमारास काही दुचाकीस्वार त्र्यंबकरोड रस्त्याने सुसाट वेगाने दुचाकी चालवित स्टंटबाजी करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्र्यंबकनाका सिग्नल परिसर, जीपओ, गंजमाळ सिग्नल परिसर तसेच सारडा सर्कल चौकात अनेक ठिकाणी रात्रीच्या सुमारास दुचाकीस्वार हुल्लडबाजी करीत असल्याचे बोलले जाते.
ठक्कर बझारसमोरील रस्त्यावर लूट
नाशिक: रात्रीच्या सुमारास ठक्कर बसस्थानकावर उतरलेले प्रवासी जुन्या सीबीएसकडे पायी जात असताना त्यांना अडवून त्यांच्याकडील रोकड काढून घेण्याच्या घटना वाढल्या आहेत. या ठिकाणी काही टवाळखोर सावजाच्या शोधात भटकत असून संघटितपणे ते प्रवाशांना लुटत असल्याच्या अनेक घटना चर्चिल्या जात आहेत.