स्वच्छतेप्रश्नी जनता दलाचे महापालिकेत घेराव आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:11 AM2021-07-08T04:11:08+5:302021-07-08T04:11:08+5:30
मालेगाव : महापालिकेच्या प्रभाग २ व ३ मध्ये गेल्या ६ दिवसांपासून स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. गटारींचे पाणी रस्त्यावर येत ...
मालेगाव : महापालिकेच्या प्रभाग २ व ३ मध्ये गेल्या ६ दिवसांपासून स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. गटारींचे पाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे संतप्त झालेल्या जनता दलाच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या स्वच्छता विभागाला धारेवर धरत ठेकेदार कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
महापालिकेच्या प्रभाग २ व ३ मध्ये खासगी कंपनीला शहर स्वच्छतेचा ठेका देण्यात आला आहे; मात्र कंपनीचे सफाई कामगार गेल्या सहा दिवसांपासून प्रभाग क्रमांक १२ व १५ मध्ये आले नाहीत. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे स्वच्छतेचा बोजवारा उडाला. यामुळे संतप्त झालेले नगरसेवक मुस्तकिम डिग्नीटी यांच्यासह जनता दलाच्या नगरसेवकांनी स्वच्छता विभागाचे निरीक्षक अमित सौदे यांना धारेवर धरत मीटरप्रमाणे गटारी व रस्ते स्वच्छता करण्याचा ठेका देण्यात आला आहे; मात्र याची पडताळणी कोण करेल, असा सवाल उपस्थित केला. गेल्या ६ दिवसांपासून स्वच्छता झाली नाही. सफाई केली जात नसल्यामुळे संबंधित स्वच्छता ठेकेदार कंपनीकडून दंडात्मक वसुली करावी, अशी मागणी करण्यात आली. बायोमायनिंगसह इतर ठेके दिले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. महापालिका प्रशासनाने स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली.
----------------------
स्वच्छतेबाबत घेतला आढावा
महापालिकेच्या सभागृहात स्वच्छतेबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत लेखाधिकारी राजू खैरनार, स्वच्छता विभाग प्रमुख अनिल पारखे, प्रभाग २ व ३ मध्ये स्वच्छता मोहीम राबविली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात नगरसेवक अब्दुल बाकी, साजीद अब्दुल रशीद, रमजू मेंबर, सादिया लईक, मुजम्मिल वफाती, राशीद अय्युब, रशीद बिडीवाला, सलीम गडबड आदींसह नगरसेवक व पदाधिकारी सहभागी झाले होते.
फोटो फाईल नेम : ०६ एमजेयुएल ०५ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगाव महापालिकेच्या सभागृहात स्वच्छतेविषयी माहिती देताना मनपाचे राजू खैरनार. समवेत नगरसेवक मुस्तकिम डिग्निटी, अब्दुल बाकी, साजीद अब्दुल रशीद, रमजू मेंबर, सादिया लईक, मुजम्मिल वफाती, राशीद अय्युब, रशीद बिडीवाला, सलीम गडबड आदी.
060721\374206nsk_36_06072021_13.jpg
फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.