बंदोबस्तावरील पोलिसांसाठी धावणार सॅनिटायझेशन व्हॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 10:34 PM2020-04-11T22:34:28+5:302020-04-12T00:33:16+5:30

नाशिक : सध्या जगभर कोरोनाचे थैमान सुरू असून, राज्यातदेखील दिवसेंदिवस कोरोना संक्रमित रुग्ण वाढत आहे, नाशिक शहर व जिल्हाही याला अपवाद राहिलेला नाही. संचारबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस दल रस्त्यावर उतरला आहे, जेणेकरून या कोरोना विषाणूची साखळी खिळखिळी होईल, यासाठी शहर व ग्रामीण पोलीस अहोरात्र लढा देत आहे.

 Sanitation van running for police on settlement | बंदोबस्तावरील पोलिसांसाठी धावणार सॅनिटायझेशन व्हॅन

बंदोबस्तावरील पोलिसांसाठी धावणार सॅनिटायझेशन व्हॅन

googlenewsNext

नाशिक : सध्या जगभर कोरोनाचे थैमान सुरू असून, राज्यातदेखील दिवसेंदिवस कोरोना संक्रमित रुग्ण वाढत आहे, नाशिक शहर व जिल्हाही याला अपवाद राहिलेला नाही. संचारबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस दल रस्त्यावर उतरला आहे, जेणेकरून या कोरोना विषाणूची साखळी खिळखिळी होईल, यासाठी शहर व ग्रामीण पोलीस अहोरात्र लढा देत आहे. परंतु त्यांनाही कोरोनाचा धोका असल्याने पोलीस दलाच्या प्रमुखांनी ‘सॅनिटायझेशन व्हॅन’ रस्त्यावर उतरविल्या आहेत.
नाशिक शहर व ग्रामीण पोलीस कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली असून, नागरिकांना घरात बसण्यास सांगितले जात आहे. संचारबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी चोवीस सात चेक पोस्ट स्थापन करण्यात आले आहेत. या पोस्टवर नियुक्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी आता शहर व ग्रामीण पोलिसांकडून स्वतंत्ररीत्या सॅनिटायझेशन व्हॅन कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह व पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मीच माझा रक्षक या संकल्पनेतून निर्जंतुकीकरण वाहन कार्यान्वित केले आहेत. ही वाहने पोलीस आयुक्तालय व पोलीस अधीक्षक कार्यालय हद्दीत नियमितपणे प्रत्येक नाकाबंदी पॉइंटवर भेट देऊन येथील कर्मचाºयांना आळीपाळीने सॅनिटाइज करणार आहेत.
या वाहनांमध्ये निर्जंतुकता द्रव्य फवारणीची यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. त्यामुळे एखाद्यावर प्रमाणे निर्जंतुक द्रव्याचे फवारे माणसाच्या अंगावर उडतात यामुळे शरीरावर असलेल्या विषाणू नष्ट होण्यास मदत होते, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे वैद्यकीय मार्गदर्शननुसार पोलीस दलाने खबरदारी या दृष्टिकोनातून ही अभिनव संकल्पना अंमलात आणली आहे.

Web Title:  Sanitation van running for police on settlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक