स्वच्छता-पाणीप्रश्नी नगरसेवक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 09:34 PM2020-11-20T21:34:17+5:302020-11-21T00:50:24+5:30

येवला : शहरातील स्वच्छता व पाणीपुरवठा प्रश्‍नी नगरसेवकांनी नगर परिषद अध्यक्ष बंडू क्षीरसागर, मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांना लेखी निवेदन दिले आहे.

Sanitation-water issue corporator aggressive | स्वच्छता-पाणीप्रश्नी नगरसेवक आक्रमक

स्वच्छता-पाणीप्रश्नी नगरसेवक आक्रमक

Next

येवला : शहरातील स्वच्छता व पाणीपुरवठा प्रश्‍नी नगरसेवकांनी नगर परिषद अध्यक्ष बंडू क्षीरसागर, मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांना लेखी निवेदन दिले आहे.  शहरात दूषित पाणीपुरवठा होत आहे. शहरात काही ठिकाणी वॉल गळती सुरू असून, काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याबरोबरच स्वच्छतेच्याही अनेक तक्रारी असल्याने परिषदेने तातडीने याप्रश्‍नी लक्ष घालून उपाययोजना करण्याची मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे.  जलशुद्धीकरण केंद्रावरील वीजपंप बदलून अधिक क्षमतेचे वीजपंप बसवून शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात यावी, अशी मागणीही सदर निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर नगरसेवक रूपेश लोणारी, अमजद शेख, पद्मा शिंदे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Web Title: Sanitation-water issue corporator aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक