कळवण येथे आरोग्य कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 11:06 PM2020-04-14T23:06:56+5:302020-04-15T00:04:34+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कळवण शहर व तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा घरातच साजरी करण्यात आली.

Sanitizer for health workers at Kalwan | कळवण येथे आरोग्य कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर

कळवण उपजिल्हा रु ग्णालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनप्रसंगी प्रशांत खैरे, संदीप जगताप, अनिल बच्छाव, सुनील बच्छाव, प्रकाश आहेर आदी.

Next

कळवण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कळवण शहर व तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा घरातच साजरी करण्यात आली.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनमध्ये प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी सर्व सार्वजनिक कार्यक्र म आणि मिरवणुका रद्द करण्याचा निर्णय घेऊन नागरिकांनी घरात राहूनच बाबासाहेबांना अभिवादन करावे, असे आवाहन कळवण शहर व तालुका डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीसह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते. त्यास आंबेडकरी अनुयायांनी प्रतिसाद दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत दिव्यांशी बायो आॅर्गनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक अनिल बच्छाव व सुनील बच्छाव यांनी कळवण उपजिल्हा रुग्णालय व पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी यांना सॅनिटायझरचे वाटप केले. रवळजी ग्रामपंचायतीत रिपाइं तालुकाध्यक्ष बापू जगताप यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्राचार्य बी. एन. शिंदे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी सुनील बस्ते, सागर जगताप, संदीप जगताप, चेतन गोयर, सुनील बस्ते, नाना पटाईत, निशांत जगताप, पप्पू बस्ते, मनोज बस्ते, मुकेश बस्ते, अमोल बस्ते, समाधान केदारे उपस्थित होते.

Web Title: Sanitizer for health workers at Kalwan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.