पोलीस ठाण्याला सॅनिटायझर फवारणी यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 11:04 PM2020-04-15T23:04:38+5:302020-04-15T23:04:59+5:30

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे स्वच्छता व सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. रस्त्यावर पोलीस नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करत आहे. त्याच पोलिसांची सुरक्षितता जपली जावी या हेतूने देवगाव येथील कृष्णतारा फ्रुट सप्लायर्सचे संचालक द्राक्ष व्यापारी संदीप डुकरे यांनी स्वखर्चाने लासलगाव पोलीस कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर फवारणी यंत्र बसविले.

Sanitizer spraying machine for police station | पोलीस ठाण्याला सॅनिटायझर फवारणी यंत्र

लासलगाव पोलीस कार्यालयाला सॅनिटायझर फवारणी यंत्र भेट देताना कृष्णतारा फ्रुट सप्लायर्सचे संचालक संदीप डुकरे. समवेत सहा. पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे व मान्यवर.

Next

देवगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे स्वच्छता व सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. रस्त्यावर पोलीस नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करत आहे. त्याच पोलिसांची सुरक्षितता जपली जावी या हेतूने देवगाव येथील कृष्णतारा फ्रुट सप्लायर्सचे संचालक द्राक्ष व्यापारी संदीप डुकरे यांनी स्वखर्चाने लासलगाव पोलीस कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर फवारणी यंत्र बसविले.
पोलिसांचे आरोग्य चांगले राहावे या हेतूने लासलगाव पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारावर डुकरे यांनी २१ हजार रुपये खर्च करत सॅनिटायझर फवारणी यंत्र बसविले आहे. यावेळी सहा. पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, राजेंद्र पानसरे, उपसरपंच विनोद जोशी, पोलीस पाटील सुनील बोचरे, जयवंत लोहरकर, दशरथ वावधाने, अमोल तुपे उपस्थित होते.

Web Title: Sanitizer spraying machine for police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.