अध्यक्षपदी संजय धोंडगे

By admin | Published: January 5, 2017 01:22 AM2017-01-05T01:22:35+5:302017-01-05T01:22:51+5:30

त्र्यंबकेश्वर : निवृत्तिनाथ समाधी संस्थान

Sanjay Dhondge as president | अध्यक्षपदी संजय धोंडगे

अध्यक्षपदी संजय धोंडगे

Next

 त्र्यंबकेश्वर : निवृत्तिनाथ समाधी संस्थानच्या नूतन अध्यक्षपदी संजय धोंडगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पवनकुमार भुतडा हे नवीन सचिव म्हणून काम पाहतील. यापूर्वीचे अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड व सचिव जयंत महाराज गोसावी या दोघांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याने रिक्त झालेल्या जागांवर थोड्याफार मतभेदानंतर खेळीमेळीच्या वातावरणात सर्वानुमते या निवडी जाहीर करण्यात आल्या.
नूतन अध्यक्ष संजय भिकाजी धोंडगे हे मौजे गुंजाळनगर (ता. देवळा) येथील रहिवासी आहेत. कीर्तनाच्या माध्यमातून ते गावोगावी जाऊन दारूबंदी, प्रौढ शिक्षण, अंधश्रद्धा, स्त्री शिक्षण, जात निर्मूलन, आदिवासी संस्कार शिबिरे, हुंडाबंदी आदि कार्य करीत आहेत. स्वच्छ त्र्यंबक, स्वच्छ यात्रा हे आपले पहिले धोरण असेल. निवृत्तिनाथ समाधी संस्थानचा कारभार आपण पारदर्शी करण्यावर भर देऊ, असे त्यांनी याप्रसंगी सांगितले. सचिवपदाची जबाबदारी सांभाळणारे युवा विश्वस्त पवनकुमार भुतडा हे सध्या येथील प्रथित यश पतसंस्थेचे संचालक असून, उच्चविद्याविभूषित आहेत. त्यामुळे आपली जबाबदारी ते व्यवस्थित पार पाडतील. या बैठकीस मावळते अध्यक्ष त्र्यंबकदादा गायकवाड, ज्येष्ठ विश्वस्त पुंडलिकराव थेटे, रामभाऊ मुळाणे, जयंत गोसावी, ललिता शिंदे, डॉ. धनश्री हरदास, जिजाबाई लांडे, पंडितराव महाराज कोल्हे, अविनाश गोसावी, योगेश गोसावी आदि विश्वस्तांसह बहिरू मुळाणे, मधुकर लांडे, संदीप शिंदे, व्यवस्थापक गंगाराम झोले आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Sanjay Dhondge as president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.