तीर्थक्षेत्र कमिटीच्या राज्य अध्यक्षपदी संजय पापडीवाल यांची अविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 07:33 PM2019-06-26T19:33:26+5:302019-06-26T19:34:09+5:30
सटाणा : पैठण येथील दिगम्बर जैन अतिशय क्षेत्र येथे झालेल्या भारतवर्षीय दिगंबर जैन तीथक्षेत्र कमिटीच्या पंचवार्षिक सभेमध्ये महाराष्ट्र अंचल अध्यक्षपदी बागलाण तालुक्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील १०८ फुट मुर्ती निर्माण समितीचे महामंत्री व सम्मेदशिखरजी, गजपंथाचे विश्वस्त संजय पापडीवाल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सटाणा : पैठण येथील दिगम्बर जैन अतिशय क्षेत्र येथे झालेल्या भारतवर्षीय दिगंबर जैन तीथक्षेत्र कमिटीच्या पंचवार्षिक सभेमध्ये महाराष्ट्र अंचल अध्यक्षपदी बागलाण तालुक्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील १०८ फुट मुर्ती निर्माण समितीचे महामंत्री व सम्मेदशिखरजी, गजपंथाचे विश्वस्त संजय पापडीवाल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
ही घोषणा निवडणुक पर्यवेक्षक व मुंबई येथील संस्थेचे राष्ट्रीय विश्वस्त डी. यु. जैन यांनी केली. संस्थेद्वारे संपूर्ण भारतभर असलेल्या दिगंबर जैन तीर्थक्षेत्रांच्या संरक्षण, संवर्धन व विकासासाठी कार्य केले जाते. ही संस्था १३० वर्ष जुनी असुन संस्थेचे राष्ट्रीय कार्यालय मुंबई येथे आहे.
संस्थेची पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा राष्ट्रीय समितीद्वारे करण्यात आली होती. त्यासाठी १३ जुन पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. राज्यभरातून संजय पापडीवाल यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेची पंचवार्षिक सभा रविवारी (दि.२३) पैठण येथे झाली.
या सभेमध्ये प्रमुख अतिथी म्हणुन संस्थेचे पूर्व राष्ट्रीय महामंत्री संतोष पेंढारी (नागपुर), राष्ट्रीय मंत्री निलम अजमेरा (उस्मानाबाद), मावळते अध्यक्ष प्रमोद कासलीवाल, सोलापूरचे अनिल जमगे, संस्थेचे पूर्व अध्यक्ष डॉ. पन्नालाल पापडीवाल तसेच अतिथी म्हणुन औरंगाबादचे अध्यक्ष ललीत पाटणी, मांगीतुंगीचे जीवन प्रकाश जैन, कचनेरचे महामंत्री भरत ठोले, पैठणचे अध्यक्ष महावीर बडजाते, विलास पहाडे, चांदवडचे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, मराठवाडा केमिस्ट असोसिएशनचे सचिव विनोद लोहाडे आदि उपस्थित होते.
संस्थेचे सचिव देवेंद्र काला यांनी संस्थेचे इतिवृत्त वाचुन दाखविले.
संस्थेचे अध्यक्ष प्रमोद कासलीवाल यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच नुतन अध्यक्ष पापडीवाल यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर संजय पापडीवाल यांची संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे याची औपचारिक घोषणा करण्यात आली.
या सभेमध्ये गजपंथा, कचनेर, पैठण, णमोकार तीर्थ, ऋ षिभगरी, चंद्रगिरी, धर्मतीर्थ, जटवाडा, पंचलेश्वर, ज्ञानतीर्थ शिर्डी, कुन्थुगिरी तीर्थ, आदि तीर्थक्षेत्रांचे विश्वस्त उपस्थित होते.
यावेळी नुतन अध्यक्ष संजय पापडीवाल, पैठणचे आमदार संदीपान भूमरे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी, नगरसेवक तुषार पाटील, ईश्वर दगडे, भूषण कावसंकर आदींनी मनोगत व्यक्त केले.
(फोटो २६ संजय पापडीवाल)