समाजसेवी संस्थांनी भविष्यवेधी व्हावे : महेश झगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:46 PM2018-01-21T23:46:50+5:302018-01-22T00:23:19+5:30
समाजसेवी संस्थांनी केवळ वर्तमानचा विचार न करता भविष्यवेधी व्हावे, त्यासोबतच देशासमोरील प्रश्नांची व्याप्ती लक्षात घेऊन देशाला वैभवशाली राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण करण्यास सहाय्यभूत कार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले. रावसाहेब थोरात सभागृहात अनुगामी लोकराज्य अभियान उत्तर महाराष्ट्र विभागातर्फे सामाजिक संस्थांच्या विकास मेळावा उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
नाशिक : समाजसेवी संस्थांनी केवळ वर्तमानचा विचार न करता भविष्यवेधी व्हावे, त्यासोबतच देशासमोरील प्रश्नांची व्याप्ती लक्षात घेऊन देशाला वैभवशाली राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण करण्यास सहाय्यभूत कार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.
रावसाहेब थोरात सभागृहात अनुगामी लोकराज्य अभियान उत्तर महाराष्ट्र विभागातर्फे सामाजिक संस्थांच्या विकास मेळावा उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर आदिवासी विकास आयुक्त रामचंद्र पाटील, महाराष्ट्र बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीकांत भारतीय, केशवस्मृती सेवा समूहाचे रत्नाकर पाटील, महाराष्ट्र चेंबर्स आॅफ इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रीचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, अमित दमाळे, सागर वैद्य आदी उपस्थित होते. महेश झगडे म्हणाले, चौथ्या औद्योगिक क्र ांतीच्या पर्वात तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे अनेक रोजगार कमी होण्याची भीती असताना नव्याने निर्माण होणाºया बेरोजगारांसाठी काय करता येईल, याविषयी विचार करणे गरजेचे आहे. समाजातील गुन्हे, आर्थिक विषमता, स्त्रीभ्रुणहत्या यावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. अशा प्रश्नांविषयीही विचार करताना कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनाला मार्गदर्शन करण्याचे आणि आवश्यकता असल्यास चुका निदर्शनास आणून देण्याचे कार्य सामाजिक संस्थांनी करावे. जनतेच्या हितासाठी अस्तित्वात येणाºया कायद्यांची अंमलबजावणी होण्यासाठी संस्थांची सक्रिय भूमिका गरजेची असल्याचे महेश झगडे यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक डमाळे यांनी केले.