त्र्यंबकेश्वर तालुक्यात संजीवनी सप्ताह साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 01:08 PM2020-07-06T13:08:15+5:302020-07-06T13:08:49+5:30
त्र्यंबकेश्वर : कृषी दिनानिमित्त तालुक्यात विविध उपक्र मांनी कृषी दिन साजरा करण्यात आला. कृषी दिनापासून तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात महिलांसाठी कृषी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असून यास महिला वर्गाचा प्रतिसाद लाभत आहे.
राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे, इगतपुरी -त्र्यंबकचे आमदार हिरामण खोसकर यांच्या उपस्थितीत या सप्ताहानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. कृषी अधिकारी संदीप वळवी यांच्या मार्गदर्शना खाली तालुक्यातील कृषी सहायक, मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक आदी महिला तसेच पुरु षांसाठी कृषी शाळांचे आयोजन करीत आहेत. कृषी विभागामार्फत १ ते ७ जुलै या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी येथे कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांची भात पीक शेतीशाळेच्या दुस-या वर्गाचे आयोजन करण्यात आले. या वर्गात प्रशिक्षणार्थींना चटई रोपवाटीकेचे महत्व, यंत्राद्वारे भात लागवडीच्या खर्चाचा ताळेबंद, तसेच युरिया, डीएपी ब्रीकेटच्या वापराबाबत माहिती देण्यात आली. तसेच पुढील वर्गांमध्ये घेण्यात येणा-या विषयांची रु परेषा विषद करण्यात आली. कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर तसेच सॅनीटायझर व मास्क यांचा अवलंब करु नच सध्या वर्ग सुरु आहेत. त्यात शेती शाळेच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख, उत्पादन खर्च, कमी शाश्वत उत्पादनाच्या पद्धती तसेच एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाविषयी माहिती दिली जात आहे. भात पिकासाठीदहा वर्ग भरविण्यात येणार असून भात पीक वाढीच्या महत्वाच्या अवस्था लक्षात घेऊन वर्गांची आखणी करण्यात येत आहे.
कृषी क्षेत्रात पुरु षांबरोबरच महिलांचा देखील मोलाचा वाटा असून ८० टक्के कामे महिलांमार्फत केली जात असतात. कृषी मंत्री दादा भुसे यांनी महिलांच्या शेतीशाळेची संकल्पना मांडली. त्यास अनुसरु न त्र्यंबकेश्वर तालुक्यात कोणे, खरोली, खंबाळे व सामुंडी येथे महिला शेतीशाळा सुरु करण्यात आलेल्या असुन त्यास प्िरतसाद मिळत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी यांनी दिली.