सोनसाखळी चोरट्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 01:24 AM2018-07-05T01:24:24+5:302018-07-05T01:25:13+5:30
मालेगाव : शहर परिसरातून सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीतील एका भामट्याला येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर येथून अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाख ४० हजार किमतीची ३ मंगळसूत्रे हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मालेगाव : शहर परिसरातून सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीतील एका भामट्याला येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर
येथून अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाख ४० हजार किमतीची ३ मंगळसूत्रे हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील कॅम्प भागातून वेगवेगळ्या चार घटनांमध्ये सोनसाखळी चोरांनी मंगळसूत्र लंपास केल्याचे प्रकार घडले होते.
या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या सोनसाखळी चोरट्यांचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना संशयित आरोपी श्रीरामपूर इराणी वसाहत येथील कासीम ऊर्फ कासम गरीबशाह (वय ३०) याचा हात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आरोपी कासीम याच्याकडून एकूण तीन मंगळसूत्र हस्तगत करण्यात आली तर अन्य दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. पत्रकार परिषदेस उपअधीक्षक अजित हगवणे, कॅम्पचे पोलीस निरीक्षक भवारी उपस्थित होते.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक करपे, निरीक्षक भवारी व पथकाने श्रीरामपूर येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकून दि. २० जून रोजी संशयित कासीम इराणी यास अटक केली. त्याची चौकशी केली असता कासीम शाह व त्याचा साथीदार अब्बास असलम जैदी यांनी चार ठिकाणी सोनसाखळी चोरी केल्याचे निष्पन्न झाले.