जिल्ह्यात टॅँकरने गाठली शंभरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 01:00 AM2018-12-04T01:00:09+5:302018-12-04T01:00:39+5:30
नाशिक : ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, सोमवारी नव्याने तीन टॅँकर मंजूर करण्यात आल्याने जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरच्या संख्येने शंभरी गाठली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा डिसेंबरमध्येच ५८ टक्क्यांवर पोहोचल्याने उन्हाळ्यात काय परिस्थिती असेल याचा अंदाज करणे कठीण झाले आहे.

यंदा मान्सूनचे उशिरा व अपुरे आगमन झाल्याने फक्त ८३ टक्केच पर्जन्यमान नोंदविले गेले. त्यातही नांदगाव, सिन्नर, मालेगाव, देवळा, बागलाण, येवला तालुक्यांकडे पावसाची वक्रदृष्टी पावसाळ्यातही राहिली. परिणामी सिन्नर तालुक्यात प्टॅँकरद्वारे पाणीपुरवठयाची वेळ आली. आॅगस्टमध्ये हजेरी लावलेल्या पावसाने सप्टेंबरमध्ये पाठ फिरविल्यामुळे अन्य तालुक्यांतही पाण्याची मागणी वाढली. विहिरींनीही तळ गाठल्यामुळे पाण्याचे स्रोत बंद झाले. जनावरांसाठीदेखील पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही.तीन टॅँकरची भर सध्या जिल्ह्यातील ९५ गावे, २८१ वाडे असे ३७६ गावांसाठी १०१ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. प्रशासनाने बागलाण व मालेगाव तालुक्यातील १२ गावे, ४ वाड्यांसाठी ११ टॅँकर नव्याने मंजूर केले होते. त्यामुळे टॅँकरची संख्या ९८ वर पोहोचली होती. त्यात सोमवारी तीन टॅँकरची भर पडली. पहिल्यांदाच जिल्ह्णात इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.