सायखेडा, चांदोरी पूरस्थिती ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:03 AM2017-07-24T00:03:37+5:302017-07-24T00:03:53+5:30

सायखेडा/निफाड : धरण क्षेत्रात सुरु असलेला संततधारेमुळे दारणा आणि गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने सायखेडा आणि चांदोरीसह नदीकाठच्या भागात पाणी घुसले बाजारतळ जलमय झाला आहे.

Sankheda, Chandori floods were 'like' | सायखेडा, चांदोरी पूरस्थिती ‘जैसे थे’

सायखेडा, चांदोरी पूरस्थिती ‘जैसे थे’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सायखेडा/निफाड : धरण क्षेत्रात सुरु असलेला संततधारेमुळे दारणा आणि गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने सायखेडा आणि चांदोरीसह नदीकाठच्या भागात पाणी घुसले असून, शेती, वीटभट्टी यासह बाजारतळ जलमय झाला आहे. तीन दिवसांपासून स्थिती ‘जैसे थे’ आहे.  नांदूरमध्यमेशवर धरणाचे आठही गेट खुले केल्याने ६१हजार १३८ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु असला तरी सायखेडा आणि चांदोरी गावातील नदी लगतच्या वस्तीत पाणी शिरले आहे. सायखेडयातील बाजारतळात पाणी गेल्याने या भागातील ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. धरण क्षेत्रात आणि गोदाकाठ भागात सतंतधार सुरु असल्याने पाणी वाढण्याची शक्यता आहे . त्यामुळे या भागात नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सायखेडा पुलाला खालुन पाणी लागले तर बहुतेक विटभट्टी, शेती क्षेत्रात पाणी घुसले होते. ग्रामपालिकेच्यावतीने नागरिकांना नोटीसा बजविण्यात आल्या आहेत.
गोदाकाठ भागात सतत तीन दिवसांपासून पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाली आहे. नागरीकांनी घराबाहेर न पडता घरात थांबनेच पसंत केले आहे. सततच्या पावसामुळे नागरीक दुकानात जात नसल्याने व्यावसायावर परिणाम झाला आहे. आर्थिक गणति कोलंडण्याची शक्यता आहे . पावसामुळे केवळ रेनकोट, छत्री यांच्या दुकानात थोड्याफार प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. त्यामुळे केवळ वाढत्या मागणीमुळे केवळ हेच दुकाने सद्या तेजीत आहे. सततच्या पावसाने शेतात पाणी साचल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाऊस पडत असल्याने शेतात असलेला चारा कापता येत नाही. त्यामुळे चार दिवसापासून चाऱ्याचा प्रश्न शेतकऱ्यांणसाठी अवघड झाला आहे. एकंदरीत अशी परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास जनजीवणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
चांदोरी गावात पाणी
चांदोरी येथील नदीपात्रालगत असलेले खंडेराव मंदिर पाण्याखाली गेले आहे. यापेक्षा जास्त प्रमाणात पाणी सोडल्यास किंवा परिसरात पाऊस वाढल्यास चांदोरी गावात पाणी शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून काही कुटुंबांना हलविले आहे.

Web Title: Sankheda, Chandori floods were 'like'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.