नाट्यमहोत्सवातून घडतात कलावंतांवर संस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 01:16 AM2018-12-08T01:16:26+5:302018-12-08T01:18:07+5:30

कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून रंगमंचावर पाऊल ठेवणाऱ्या कलावंतांसाठी नाट्यमहोत्सव मोठी संधी असते. नवनवीन कलावंतांना घडविण्याची परंपरा कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून रुजली असून, अशा महोत्सवातून चांगले कलाकार घडले पाहिजेत, असे प्रतिपादन अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष कीर्ती शिलेदार यांनी केले.

Sanskars on the artists come from the Natya Mahotsav | नाट्यमहोत्सवातून घडतात कलावंतांवर संस्कार

राज्य कामगार कल्याण नाट्य स्पर्धेचे उद््घाटन नटराज पूजन करून ९८व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष कीर्ती शिलेदार. समवेत श्रीकांत बेणी, सुनील ढगे, मेघराज राजेभोसले, भावना बच्छाव, सतीश दाभाडे.

Next
ठळक मुद्देकामगार कल्याण मंडळ ६६वा प्राथमिक नाट्यमहोत्सव

नाशिक : कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून रंगमंचावर पाऊल ठेवणाऱ्या कलावंतांसाठी नाट्यमहोत्सव मोठी संधी असते. नवनवीन कलावंतांना घडविण्याची परंपरा कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून रुजली असून, अशा महोत्सवातून चांगले कलाकार घडले पाहिजेत, असे प्रतिपादन अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष कीर्ती शिलेदार यांनी केले.
प. सा. नाट्यमंदिर येथे महाराष्टÑ कामगार कल्याण मंडळ नाशिक विभाग आयोजित ६६व्या प्राथमिक नाट्यमहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते नटराजाला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन दीपप्रज्वलन करण्यात आले. व्यासपीठावर चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, श्रीकांत बेणी, सुनील ढगे आदी उपस्थित होते. यावेळी शिलेदार म्हणाल्या, कामगार कल्याण नाट्यमहोत्सवाच्या माध्यमातून कलावंतांना चांगली संधी आहे. या माध्यमातून नाट्यक्षेत्राला नक्कीच चांगले कलावंत मिळू शकतात. कलावंतांना अशाप्रकारचे व्यासपीठ मिळणे ही खरोखर चांगली बाब आहे. असेही त्या म्हणाल्या. याप्रसंगी मेघराज राजे भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मिलिंद पाटील यांनी केले. प्रास्ताविक सहायक कल्याण आयुक्त भावना बच्छाव यांनी केले. आभार मिलिंद पाटील यांनी मानले. परीक्षक म्हणून सुनील देशपांडे, प्रदीप पाटील, संध्या धोपावकर यांनी काम पाहिले.
‘आनंद ओवरी’ नाटक सादर
सायंकाळी मालेगाव कामगार केंद्राने ‘आनंद ओवरी’ हे दि. वा. मोकाशी लिखित नाटक सादर केले. सुरभी थिएटर प्रस्तुत आनंद ओवरी या नाटकात संत तुकाराम यांच्या वैयक्तिक आयुष्यातील ससेहोलपट दाखविण्यात आली आहे. संत तुकारामाची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्टÑाच्या सांस्कृतिक परपरेचे महान द्योतक आहे. त्यांची अभंगवाणी हीच त्यांची लोकप्रियता आणि ओळख आहे. असे असले तरी त्यांची अंतर्गतदेखील एक ओळख आहे. त्यांनी जे भोगले, सोसले त्यातून त्यांचे तत्त्वज्ञान निर्माण झाले. त्यातून अंभग निर्माण झाले. त्यांच्या आचरणातील बारकावे या नाटकात टिपण्यात आले आहेत. संदीप कोते आणि राजेश शर्मा यांनी भूमिका साकारल्या.

Web Title: Sanskars on the artists come from the Natya Mahotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.