शेतकरी कुटुंबात उद्योजकतेचे संस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 01:18 AM2019-02-10T01:18:26+5:302019-02-10T01:19:38+5:30

शेतकरी कुटुंबात अगदी लहान-थोरांसह सर्वांनाच वेगवेगळी कामे करावी लागतात. त्यातूनच माणूस शिकत जाऊन उद्योजकतेसाठी आवश्यक संस्कार घडत असल्याचे मत माजी महापौर व उद्योजक प्रकाश मते यांनी व्यक्त केले.

Sanskars of entrepreneurship in the farming family | शेतकरी कुटुंबात उद्योजकतेचे संस्कार

माजी महापौर प्रकाश मते यांची मुलाखत घेताना सुरेखा बोºहाडे व राजेंद्र सांगळे.

Next
ठळक मुद्देप्रकाश मते : ‘संवाद’तर्फे मुलाखत

नाशिक : शेतकरी कुटुंबात अगदी लहान-थोरांसह सर्वांनाच वेगवेगळी कामे करावी लागतात. त्यातूनच माणूस शिकत जाऊन उद्योजकतेसाठी आवश्यक संस्कार घडत असल्याचे मत माजी महापौर व उद्योजक प्रकाश मते यांनी व्यक्त केले.
कुसुमाग्रज स्मारक येथे ‘संवाद’तर्फे सुरेखा बोºहाडे व राजेंद्र्र सांगळे यांनी प्रकाश मते यांची मुलाखत घेतली.
यावेळी संवादचे अध्यक्ष अभिमन्यू सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गुंजाळ उपस्थित होते. प्रकाश मते यांनी यावेळी मुलाखत कर्ताच्या प्रश्नांना उत्तर देतांना त्यांच्या अनुभवाची जोड देत शेतकरी कुटुंबात जन्म होणे हे आपल्या यशाचे गमक असल्याचे स्पष्ट करताना त्यांनी शैक्षणिक व व्यावसायिक जीवनाचा पट उपस्थितांसमोर उलगडून सांगितला. यात कंत्राटी व्यवसायासोबत जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायातील काही अनुभवही त्यांनी सांगितले. राजकीय प्रवासाच्या वाटचालीतील आठवणींना उजाळा देताना दिवंगत डॉ. वसंतराव पवार यांच्यासारखा राजकीय गुरू लाभल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका निवडणूक लढविल्याचेही सांगताना प्रकाश मते यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देत आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनातील तसेच महापौर कारकिर्दीतील विविध आठवणींना उजाळा दिला.

Web Title: Sanskars of entrepreneurship in the farming family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.