तंत्रज्ञानाच्या मदतीने गिरवले जाताहेत संस्कृतचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 01:22 AM2018-07-13T01:22:19+5:302018-07-13T01:22:39+5:30
नाशिक : आजवर १०वी, १२वीच्या परीक्षेत स्कोअरिंग करून पुढे त्या विषयाकडे ढुंकूनही न बघता अवहेलना केली जात असलेल्या संस्कृत विषयाला सध्या मात्र आधुनिक तंत्रज्ञान, सोशल मीडियामुळे चांगले दिवस आल्याचे चित्र आहे. फ्री अॅप्स, यू ट्यूब, संकेतस्थळे आदींद्वारे विविध वयोगटातील संस्कृतप्रेमी संस्कृतचा अभ्यास करत असून, या विषयाचा केवळ पुस्तकी ज्ञानाबरोबरच स्पर्धा परीक्षा, संशोधन, पत्रकारिता, लायब्ररी विज्ञान, पुरातत्व खाते, स्थापत्यशास्त्र आदी क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्याचा मोठा लाभ होत असल्याचेही समोर आले आहे.

किचकट, अवघड विषय म्हणून संस्कृत विषयाबद्दल पूर्वी गैरसमज होता, मात्र आता या विषयाचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या वाढली असून, सकारात्मक चित्र दिसून येत आहे. ‘अमरकोष’, ‘संस्कृतधातू
रुपावली’ असे अनेक मोफत अॅप संकेतस्थळावर उपलब्ध असून, ते डाउनलोड केल्यानंतर अभ्यासकांना त्याचा चांगला उपयोग होत आहे. याशिवाय आॅनलाइन शब्दकोषही उपलब्ध असून एखादा शब्द अडल्यास तो तत्काळ आॅनलाइन बघता येत आहे. याशिवाय ‘घरच्या घरी संस्कृत कसे शिकावे’ या विषयावर यू ट्यूबवर असंख्य व्हिडीओज उपलब्ध असून त्याचाही नियमित वापर केला जात आहे.