सटाण्यात संत गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 05:41 PM2019-02-26T17:41:59+5:302019-02-26T17:45:12+5:30
सटाणा : बागलाण तालुक्यातील धोबी (परिट) समाजाच्यावतीने संत गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सटाणा : बागलाण तालुक्यातील धोबी (परिट) समाजाच्यावतीने संत गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
शहरातील देव मामलेदार यशवंतराव महाराज मंदिराजवळ सजवलेल्या रथ पालखीत गाडगेबाबांची प्रतिमा ठेवुन जिल्हाध्यक्ष राजेश परदेशी व राज्य कोषाध्यक्ष सि. आर. परदेशी यांच्या हस्ते पुजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर देव मालेदार यशवंतराव महाराज मंदिरापासुन रथ, पालखी मिरवणुकीस सुरुवात करून चावडी चौक, पेठ गल्ली, शिवतीर्थ मार्गे पिंपळेश्र्वर मंदिराजवळ मिरवणुकीची सांगता करण्यात आली. यावेळी परिट धोबी समाजाचे जिल्हा अध्यक्ष राजेश परदेशी यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी समाजाचे तालुकाध्यक्ष शेखर परदेशी,वामन शिंदे, विजय परदेशी, सुरेश मोगरे, कुणाल परदेशी, प्रकाश मोगरे, अनिल मोगरे, भरत परदेशी, नंदकिशोर परदेशी, राजेश परदेशी, शिवाजी शिंदे, सुनिल अंतुरेश्र्वर, विशाल खैरनार, प्रकाश खैरनार, सुरेश परदेशी, राजेंद्र मोगरे, अनिल परदेशी, रवि बच्छाव, सुरज मोगरे, मनोज शिंदे, संजय खैरनार आदींसह सटाणा, देवळा, कळवण शहरातील समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.
रस्त्यांची स्वच्छता....
संत गाडगे महाराज जयंतीनिमित्ताने जुनी पेठ गल्ली व शिवतीर्थ परिसरातिल रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. पिपळेश्र्वर रोड वरील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना कपडे वाटप करण्यात आले. तर अंध अपंग कुटुंबांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. दरम्यान या मिरवणुक प्रसंगी परिट (धोबी) समाज बांधवांनी हातात स्वच्छतेकडुन समृद्धीकडे, झाडे लावा, जीवन जगवा, प्लॅस्टीकचा वापर टाळा, बेटी बचाव बेटी पढाव, पर्यावरणाचे रक्षण करा, शौचालयाचा वापर करा असे फलक घेऊन जनजागृती केली.