संत निरंकारी मंडळातर्फे ‘स्वच्छता मोहीम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:43 AM2019-02-24T00:43:28+5:302019-02-24T00:43:49+5:30
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन नाशिक शाखेच्या वतीने व मंडळाच्या सद्गुरू माता सुदीक्षा हरदेवसिंह महाराज यांच्या आदेशानुसार यंदाच्या वर्षीही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
सिडको : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन नाशिक शाखेच्या वतीने व मंडळाच्या सद्गुरू माता सुदीक्षा हरदेवसिंह महाराज यांच्या आदेशानुसार यंदाच्या वर्षीही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही माता सुदीक्षा हरदेवसिंह महाराज यांच्या आदेशानुसार नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉ. जगदाळे, निवासी वैद्यकीय अधिकारी सैंदाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी डॉ. सैंदाणे यांनी स्वच्छता ही मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असून, रोगराईपासून सुटकारा मिळण्यासाठी स्वत:पासून स्वच्छतेची प्राथमिक सुरुवात करणे गरजेचे आहे. अस्वच्छता व रोगराईमुळे कोणकोणते आजार होऊ शकतात, याबाबतही डॉ. सैंदाणे यांनी मार्गदर्शन केले. स्वच्छता अभियानास संत निरकांरी चॅरिटेबल फाउंडेशन सेवादल व साथ-संगत मिळून सुमारे पाचशे साधकांनी सहभाग घेतला.
स्वच्छतेची घेतली शपथ
स्वच्छता ही मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असून, परिसरातील वाढत्या रोगराईपासून मुक्तता होण्यासाठी सर्वांनी स्वत:पासून स्वच्छता करण्याची गरज आहे. वाढत्या रोगराईमुळे अनेकांना आजाराचा सामना करावा लागतो, यासाठी सर्वांनी स्वच्छता राखणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. तसेच यावेळी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.