त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी जाणार ’शिवशाही’ थाटात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 09:37 PM2020-06-06T21:37:19+5:302020-06-07T00:43:50+5:30
त्र्यंबकेश्वर : संत निवृत्तिनाथ महाराज पायी दिंडी पालखी सोहळा दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमा किंवा ज्येष्ठ कृ.१ रोजी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे ...
त्र्यंबकेश्वर : संत निवृत्तिनाथ महाराज पायी दिंडी पालखी सोहळा दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमा किंवा ज्येष्ठ कृ.१ रोजी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे रवाना होत असतो. मात्र, यंदा कोरोना महामारीचे संकट असल्याने दिंडी सोहळा स्थागित केला आहे. त्याऐवजी आषाढ शु. दशमीला शिवशाही बसमधून निवृत्तिनाथांची पालखी ३0 जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
बसमध्ये पन्नास प्रवासी बसण्याची क्षमता असली तरी पालखीसोबत कोण आणि किती भाविक जाणार याचा निर्णय जिल्हाधिकारी घेणार आहेत. त्यामुळे नाथांच्या भाविकांचे त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. विश्वस्त, टाळकरी, विणेकरी तसेच मानकरी पालखीसह पंढरपूरकडे रवाना होतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दशमीला पंढरपूर येथे आगमन झाल्यानंतर आषाढ दशमी (दि.३0) मुक्काम व दुस-या दिवशी आषाढ शु.११ देवशयनी आषाढी एकादशी पंढरपूर यात्राा दर्शनादी सोपस्कार पार पडल्यानंतर दुस -या दिवशी उपवास सोडल्यानंतर पालखी पुन्हा बसनेच त्र्यंबकेश्वरकडे परतीच्या प्रवासास प्रयाण करणार आहे.
परंपरेनुसार निवृत्त्तिनाथांच्या पादुका गर्भगृहातून बाहेर काढण्यात येतील. पूजाविधी केला जाईल. यानंतर संजीवन समाधी मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर आषाढ शु.दशमी पर्यंत पादुका सभा मंडपात ठेवण्यात येतील. मधल्या काळात दररोज विधीवत पूजाअर्चा होत जाईल.असा यंदाच्या पंढरपूर वारीचा कार्यक्र म आहे. राज्य शासनाच्या आदेशाचा आदर करु न विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
विश्वस्त त्र्यंबकराव गायकवाड, पंडितराव कोल्हे रामभाऊ मुळाणे, पालखी प्रमुख पुंडलिकराव थेटे, जयंत गोसावी, योगेश गोसावी, ललिता शिंदे, जिजाबाई लांडे, मधुकर लांडे, संदीप शिंदे यांच्या संमतीनेच शिवशाही बसनेच पालखी नेण्याचे निश्चित झाले. दरम्यान पालखी समवेत समाधी संस्थानचे मानकरी मनोहर महाराज, बेलापूरकर, बाळकृष्ण महाराज डावरे, जयंत महाराज, गोसावी देहुकर
माऊली आदींसह विश्वस्त मंडळातील सदस्य, टाळकरी, विणेकरी, पखवाज वादक आदींचा समावेश असेल. पण किती लोक आणि कोण याचा निर्णय जिल्हाधिकारी ठरवतील.
पालखी शिवशाही बसने थेट पंढरपूरला जाणार असल्याने व पादुका त्र्यंबकेश्वर येथेच असणार असल्याने निवृत्तिनाथ संजीवन समाधी सोहळा मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत गर्दी न करता त्र्यंबकेश्वर येथेच संपन्न होईल. संजीवन समाधी सोहळा त्र्यंबकेश्वरलाच पार पडणार असल्याची ही तिसरी वेळ आहे. याप्रसंगी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येईल.
- पवनकुमार भुतडा,
श्री निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थान, त्र्यंबकेश्वर
पालखीची परंपरा ठेवली कायम!
बसमध्ये ५0 प्रवासी असतात. पण त्र्यंबकेश्वरहून किती लोक पाठवण्यास जिल्हाधिकारी परवानगी देतील ते सांगता येत नाही. बसमध्ये फिजिकल डिस्टिन्संगचा वापर करण्यात येईल. तसेच बस समवेत पोलीस बंदोबस्त असावा अशीही मागणी करणार असल्याचे संस्थानचे अध्यक्ष पवनकुमार भुतडा यांनी सांगितले. दरम्यान, पालखीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून, निवृत्तिनाथ महाराजांच्या पादुका गर्भगृहातून काढून पालखीत ठेवण्यात आल्या. यावेळी ‘बोला पुंदलिक वरदा हरी विठ्ठल’चा जयघोष करा मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यात आली. आता या ठिकाणी दैनंदिन पूजा-अर्चा-अभंग, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.