संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांचा ७२१वा संजीवन समाधी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 12:05 AM2018-07-11T00:05:20+5:302018-07-11T00:11:31+5:30
त्र्यंबकेश्वर : येथे संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांचा ७२१वा संजीवन समाधी सोहळा मंगळवारी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी माधवदास महाराज राठी यांचे कीर्तन पार पडले. जिल्ह्यातील वारकरी या समाधी सोहळ्य्त्र्यंबकला निवृत्तिनाथांचा संजीवन समाधी सोहळा ाासाठी उपस्थित होते. हा सोहळा संस्थानचे सचिव पवनकुमार भुतडा, माजी अध्यक्ष मुरलीधर पाटील, विश्वस्त रामभाऊ मुळाणे, पुंडलिक थेटे, जिजाबाई लांडे, मधुकर लांडे आदी विश्वस्त उपस्थित होते.
त्र्यंबकेश्वर : येथे संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांचा ७२१वा संजीवन समाधी सोहळा मंगळवारी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
यावेळी माधवदास महाराज राठी यांचे कीर्तन पार पडले. जिल्ह्यातील वारकरी या समाधी सोहळ्य्त्र्यंबकला निवृत्तिनाथांचा संजीवन समाधी सोहळा ाासाठी उपस्थित होते. हा सोहळा संस्थानचे सचिव पवनकुमार भुतडा, माजी अध्यक्ष मुरलीधर पाटील, विश्वस्त रामभाऊ मुळाणे, पुंडलिक थेटे, जिजाबाई लांडे, मधुकर लांडे आदी विश्वस्त उपस्थित होते.
निज ज्येष्ठ वद्य द्वादशी ७२१ वर्षांपूर्वी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांच्या दृष्टीने आपले अवतार कार्य संपले असून, अवघ्या २४व्या वर्षी त्र्यंबकेश्वर येथील गोदावरीचे उगमस्थान ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी तत्कालीन जंगलात (सध्याच्या समाधिस्थळी) संजीवन समाधी घेण्यासाठी जागा निश्चित केली. तत्पूर्वी सप्तशृंगीगड, नाशिक, पंचवटी, तपोवन आदी ठिकाणी दर्शन घेऊन त्र्यंबकेश्वर येथे येण्यासाठी नाशिकहून त्र्यंबकेश्वर येथे येण्यासाठी प्रस्थान केले.त्र्यंबकेश्वर येथे ज्येष्ठ वद्य द्वादशी या दिवशी सर्व संतमहंत आदींच्या उपस्थितीत सर्वांना वंदन करून निवृत्तिनाथ महाराज समाधीसाठी केलेल्या गारमध्ये समाधिस्त झाले. त्यावेळी मंत्रोच्चार झाले. निवृत्तिनाथ महाराजांचा जयजयकार झाला आणि गारेचे तोंड बंद करतांना त्यावर शिळा ठेवली. अशा तºहेने संत निवृत्तिनाथ महाराज यांनी संजीवन समाधी घेतली.